मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह, माथेरानमधील खळबळजनक घटना

महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह, माथेरानमधील खळबळजनक घटना

माथेरानमध्ये एका महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

माथेरानमध्ये एका महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

माथेरानमध्ये एका महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मोहन जाधव, प्रतिनिधी

ठाणे, 12 डिसेंबर : माथेरानमध्ये (Matheran) एक भयानक घटना समोर आली आहे. माथेरानला थंड हवेचं ठिकाण म्हणून मानलं जातं. तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दर विकेंडला हजारो पर्यटक (tourist) जात असतात. पण याच पर्यटनस्थळाहून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेचा निर्वस्र अवस्थेत शिर नसलेला मृतदेह (dead body) आढळून आला. संबंधित घटना ही आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटना उघड झाल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

माथेरान रेल्वे स्थानकाच्या समोरील खोलीत मृतदेह

माथेरानला अनेक पर्यटक येत असतात. शनिवार आणि रविवारी तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. अशातच या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेचा मृतदेह आज (रविवारी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माथेरान रेल्वे स्थानकासमोरील बंद असलेल्या खोलीत मृतदेह आढळून आला आहे. प्रत्यक्षदर्शीने जेव्हा सर्वात आधी पाहिलं तेव्हा महिलेचे शिर गायब होते. तसेच तिच्या अंगावर कपडे नव्हते. महिलेसोबत फिरायला आलेल्या व्यक्तीनेच तिचे शिर सोबत नेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. माथेरान रेल्वे स्थानकासमोरील एका बंद खोलीत हा मृतदेह सापडला. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी सहसा कुणी जात नाही, असे सांगितले जात आहे. महिलेसोबत एक पुरुषही फिरायला आला होता, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या खोलीत कोणतीही बॅग अथवा काहीही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे महिलेची ओळख पटवणे कठीण आहे, असेही सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास माथेरान पोलीस करत आहेत.

माथेरानमध्ये वारंवार या अशा घडना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एक थंड हवेचं ठिकाण म्हणून दररोज शेकडो पर्यटक इथे येतात. पण अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने पोलिसांच्या कार्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. माथेरामध्ये नुकत्याच घडलेल्या या घटनेचा पोलीस आता कसा तपास करतात आणि आरोपींच्या कशाप्रकारे बेड्या ठोकतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos