'सविताभाभी तुझा आकार...' अश्लिल उद्योग मित्र मंडळाचा कहर, गाणं आलं समोर VIDEO

'सविताभाभी तुझा आकार...' अश्लिल उद्योग मित्र मंडळाचा कहर, गाणं आलं समोर VIDEO

'सविताभाभी'च्या नावाने पुण्यात पोस्टर झळकले होते. नंतर हा 'अश्लिल उद्योग' मित्र मंडळाने प्रमोशनासाठी घडवला होता.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी :  काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात  चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते. नंतर हा 'अश्लिल उद्योग' मित्र मंडळाने प्रमोशनासाठी घडवला होता. पण, आता याच मंडळाकडून सविताभाभीवर गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

अश्लिल उद्योग' मित्र मंडळ या नावाचा हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामुळे  अभिनेत्री सई ताम्हणकर, अमय वाघ, अभय महाजन यांच्यासह इतर कलाकार आहे. सविताभाभी या पॉर्न कॅरेक्टरला घेऊन हा सिनेमा साकारण्यात आल्याचं दिसतंय. याच सिनेमातील 'सविताभाभी तुझा आकार डोक्याला लावतोय..' असं हे गाण रिलीज करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासात हे गाणं व्हायरल झालं आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, पुण्यात सविताभाभी तू इथंच थांब, हे पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा प्रकार अश्लील उद्योग मित्र मंडळाचा प्रसिद्धी करण्याचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता हा वाद थेट कोर्टात पोहोचला असून सविताभाभी या कॉमिक कॅरेक्टरवर निलेश गुप्ता यांनी दावा सांगत नोटीस धाडली. अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाच्या निर्मात्यांना ही नोटीस पाठविण्यात आली होती. सविताभाभी हे पात्र कॉमिक कॉपीराईट असताना त्याबद्दल परवानगी न घेता त्याचा वापर केल्याबद्दल ही पाठवलीय नोटीस पाठवली.

काय आहे प्रकार?

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते. यानंतर मात्र पुणेकरांमध्ये ही सविताभाभी कोण याबद्दल उत्सुकता लागली होती. अखेर सविताभाभीचं गुढ उलगडलं आहे. ही अश्लील उद्योग मित्र मंडळ या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे. ही जाहिरात त्यांच्या आगामी सिनेमाची आहे.

याशिवाय त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे. यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणतं आहे. गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही..जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही...असं सई म्हणाली आहे. यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे.

First published: February 26, 2020, 8:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या