मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बलात्कार पीडितेनं ऑनलाइन मागवले विष,आरोपीच्या समोरच केले प्राशन

बलात्कार पीडितेनं ऑनलाइन मागवले विष,आरोपीच्या समोरच केले प्राशन

अत्याचार करणारा आरोपी हा शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे

अत्याचार करणारा आरोपी हा शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे

अत्याचार करणारा आरोपी हा शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Badlapur, India

अंबरनाथ, 28 सप्टेंबर : एका बलात्कार पीडित तरुणीने चक्क ऑनलाईन साइटवरून विष मागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या समोरच तिने हे विष पिले. अत्याचार करणारा आरोपी हा शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ऑनलाइन साईट वरून अशा प्रकारे विष सहजरीत्या उपलब्ध होत असतील तर ते खूपच घातक आहे.

बलात्कार पीडित तरुणीने ऑनलाइन साईटवरून विष मागवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. उल्हासनगरच्या माणेरे भागात राहणाऱ्या महेंद्र भोईर याने २५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा अत्याचार केले. त्यानंतर अत्याचार करणाऱ्याने महेंद्रने लग्नाला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र त्याला अजून अटक करण्यात आली नाही.

(एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 कोटींचा माल जप्त)

या पीडित तरुणीची महेंद्रशी उल्हासनगरमध्ये ओळख झाली, त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान याचा फायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून महेंद्र याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारताच महेंद्र टाळाटाळ करून लागला. अखेर आरोपी महेंद्रच्या कारमध्येच पीडितेने विष पिले.

धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरुणीने गुगलवर सर्च करून "xxx xx बुटी डॉट कॉम या ऑनलाइन साईड वरून 50 ग्राम विष ऑर्डर केले आणि तिला त्याची डिलिव्हरी पण देण्यात आली. आता ज्या साईटवरून पीडितेने हे विष मागवले त्याचा बदलापूर पोलीस तपास करत आहेत.

(पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात गेला व्यक्ती; शरीरात आढळले स्टीलचे 63 चमचे)

ऑनलाइन साईटवरून अशा प्रकारे सहजरित्या विष उपलब्ध होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्याला आळा बसण्यासाठी राज्य शासनाने त्वरित पावलं उचलणे गरजेचे आहे.

First published: