मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 कोटींचा माल जप्त

एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 कोटींचा माल जप्त

पोलिसांनी ब्युटी शॉपचा मालक 78 वर्षीय याकूब उस्मान याला अटक केली.

पोलिसांनी ब्युटी शॉपचा मालक 78 वर्षीय याकूब उस्मान याला अटक केली.

पोलिसांनी ब्युटी शॉपचा मालक 78 वर्षीय याकूब उस्मान याला अटक केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

वसीम अन्सारी, प्रतिनिधी

मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी 7 गोदामांवर छापे टाकले. तसेच परदेशातून एक्सपायरी (कालबाह्य) कॉस्मेटिक उत्पादने आयात केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या छाप्यांमध्ये 3.28 कोटी रुपयांची एक्सपायरी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

याकूब उस्मान असे अटक करण्यात आलेल्या 78 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी कालबाह्य झालेल्या उत्पादनांच्या तारखेवर स्टिकर लावायचा आणि त्यांची मुंबई आणि इतर शहरांमध्ये पुनर्विक्री करायचा. अर्शद शेख असे आरोपीचे नाव आहे. तो युरोप, चीन आणि इतर देशांतून एक्सपायर झालेले कॉस्मेटिक उत्पादने मागवायचा आणि तारखा बदलून मुंबई आणि इतर शहरातील बाजारपेठेत विकायचा.

याबाबत एका अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी मुंबईतील गोरेगाव, क्रॉफर्ड मार्केट आणि दाना बंदर येथील 7 गोदामांवर एकाच वेळी छापे टाकले. ही गोदामे नॅशनल इम्पेक्स आणि एमएस इंटरनॅशनल कंपन्यांशी निगडीत होती. यावेळी केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेने 3.28 कोटी रुपयांची उत्पादने जप्त केली.

क्राईम ब्रँचने लोकांना कॉस्मेटिक उत्पादने खरेदी करताना त्यांची एक्सपायरी डेट नीट तपासून पाहावी, एक्सपायरी डेटमध्ये छेडछाड झाल्याचे दिसत असल्यास ते खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. छाप्यादरम्यान परफेक्ट कॉस्मेटिक्स, कलर झोन, परमनंट हेअर कलर, ग्लॅमर परमनंट हेअर कलर, बायो वुमन प्रोफेशनल हेअर कलर अशा विविध नावांची सौंदर्य उत्पादने जप्त करण्यात आली.

हेही वाचा - Mumbai Chembur Crime : घटस्फोट देत नसल्याने पतीने गाठली खालची पातळी, धक्कादायक कारण समोर

पोलिसांनी ब्युटी शॉपचा मालक 78 वर्षीय याकूब उस्मान याला अटक केली. याशिवाय क्रॉफर्ड मार्केटच्या दुकानावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे 13 लाख रुपये रोख, 14 हार्डडिस्क, दोन मोबाइल फोन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 ऑक्टोबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai