मराठी बातम्या /बातम्या /देश /

Shocking! पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात गेला व्यक्ती; शरीरात आढळले स्टीलचे 63 चमचे

Shocking! पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात गेला व्यक्ती; शरीरात आढळले स्टीलचे 63 चमचे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या पोटात चमचे निघाल्याचं पाहून डॉक्टरही अचंबित झाले. सध्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. (Spoons in Stomach)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 28 सप्टेंबर : ऑपरेशन दरम्यान पोटातून ट्यूमर, दगड बाहेर काढल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, एखाद्याच्या पोटात स्टीलचे चमचे आढळल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? तेही एक-दोन नव्हे तर तब्बल 63 चमचे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या पोटात चमचे निघाल्याचं पाहून डॉक्टरही अचंबित झाले. सध्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पतिसोबत महिलेचं भयानक कृत्य, गुप्तांग कापलं अन् रात्रभर झोपली मृतदेहासोबत

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपाडा गावात राहणाऱ्या 40 वर्षीय विजयला पोटदुखीचा त्रास होत होता. यामुळे त्यांना मुझफ्फरनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता पोटात काहीतरी वस्तू असल्याचं त्यांना आढळलं.

डॉक्टरांनी विजयच्या कुटुंबीयांना सांगितलं की लगेच ऑपरेशन करावं लागेल. कुटुंबीयांच्या संमतीनंतर विजयवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटातून ही वस्तू काढली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विजयच्या पोटात अनेक स्टीलचे चमचे होते. मात्र, त्याचा पुढचा भाग गायब होता. डॉक्टरांनी एक एक करून त्याच्या पोटातून ६३ चमचे काढले. तब्बल ४ तास डॉक्टरांनी विजयवर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी या ऑपरेशनचा व्हिडिओही बनवला.

जुगार खेळायला, जमिन विकायला पत्नीचा विरोध, दारूड्या पतीने उचललं भयानक पाऊल

ऑपरेशननंतरही विजयची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, अशी केस आम्ही पहिल्यांदाच पाहिली आहे. कोणी इतके चमचे का गिळेल? असा प्रश्न त्यांना पडला आहे. याप्रकरणी घरातील एका व्यक्तीने सांगितलं की, विजयला ड्रग्जचं व्यसन होतं. व्यसनमुक्तीसाठी त्याला शहरातीलच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आलं. तेथील कर्मचाऱ्यांनी विजयला जबरदस्तीने चमचे खाऊ घातल्याचा आरोप अखिलने केला आहे. त्याने असंही म्हटलं की घरी आल्यानंतर विजयने आम्हाला याबद्दल सांगितलं नाही.

First published:

Tags: Shocking news