Home /News /crime /

'हजारो लोकांसमोर झाला बलात्कार'; 2 महिन्यांनंतर 15 वर्षीय पीडितेनं सांगितली ती भयानक घटना

'हजारो लोकांसमोर झाला बलात्कार'; 2 महिन्यांनंतर 15 वर्षीय पीडितेनं सांगितली ती भयानक घटना

एका मुलीवर हजारो लोकांसमोरच बलात्कार (Rape) केला गेला. या घटनेनंतर पीडितेला मोठा धक्का बसला आहे.

     नवी दिल्ली 07 सप्टेंबर : बलात्कार (Rape) हा एक असा गुन्हा आहे जो एखाद्या महिला किंवा मुलीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. परवानगीशिवाय एखाद्या महिलेला स्पर्श करणं किंवा तिच्या शरीराला हात लावणं हे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ असतो. बलात्कारानंतर अनेक महिला पूर्णपणे खचून जातात. मात्र, आता जे प्रकरण समोर आलं आहे ते अत्यंत भयंकर आहे. यात एका 15 वर्षीय मुलीवर हजारो लोकांच्या समोरच बलात्कार (Rape on Minor) झाला होता. ही धक्कादायक घटना यूकेमधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका मुलीवर हजारो लोकांसमोरच बलात्कार केला गेला. या घटनेनंतर पीडितेला मोठा धक्का बसला आहे. तिनं आपल्यासोबत घडलेली ही घटना आता लोकांना सांगितली आहे. तिनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिला सर्वांसमोरच खोल पाण्यात घेऊन गेला. समुद्रातच त्यानं या मुलीवर बलात्कार केला. पाण्यात कोणीही तिचा आवाज ऐकला नाही. मुलीनं सांगितलं, की जेव्हा तिच्यावर बलात्कार होत होता तेव्हा तिथे हजारो लोक उपस्थित होते. मात्र, कोणीही काही ऐकलं किंवा पाहिलं नाही. आधी पतीचे कान कापले, मग गळ्यावरून फिरवला सुरा अन्...; महिलेचं धक्कादायक कृत्य तिनं पुढे सांगितलं, की आरोपीचं वय केवळ 17 वर्ष होतं. त्यानं आपलं नाव डब्बी असं सांगितलं होतं. त्यानं खोल पाण्यात मुलीवर बलात्कार केला. जेव्हा ही मुलगी बचाव करण्यासाठी तिथून स्वतःची सुटका करून घेऊ लागली तेव्हा आरोपी तिच्या मागे आला. ही घटना 18 जुलैची आहे. मात्र, आता या धक्क्यातून सावरल्यानंतर मुलीनं या घटनेचा खुलासा केला. विरार हादरलं! मंदिरात जाताना घडला घात; भल्या पहाटे बड्या बिल्डरचा खेळ खल्लास मुलीनं सांगितलं, की 17 वर्षीय आरोपीला ती बीचवरच भेटली होती. थोडीफार ओळख झाल्यानंतर दोघंही समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. आरोपीनं तिला पाण्यात ओढून नेलं. यानंतर तिचे पाय जमिनीपासून बरेच वर होते. आरोपी तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता. ती ओरडत होती मात्र लाटांच्या आवाजामुळे कोणालाही ऐकू गेलं नाही. यानंतर ती बीचजवळ असलेल्या बाथरूममध्ये गेली मात्र आरोपी तिथेही आला. तिनं ओरडायला सुरुवात केल्यानं तो तिथून फऱार झाला. मुलीनं सांगितलं, की जेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली तेव्हापासून ती प्रचंड घाबरलेली होती. या घटनेनं तिच्यात बरेच बदल झाले. तिनं बाहेर जाणंही बंद केलं होतं आणि कोणासोबत बोलण्याचीही तिची इच्छा नव्हती. तिनं आता आरोपीचं स्केच बनवून पोलिसांकडे दिलं आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून मुलीनं दिलेल्या माहितीनुसार तो बृमिंघम येथे राहतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape on minor

    पुढील बातम्या