Home /News /mumbai /

विरार हादरलं! मंदिरात जाताना घडला घात; भल्या पहाटे बड्या बिल्डरचा खेळ खल्लास

विरार हादरलं! मंदिरात जाताना घडला घात; भल्या पहाटे बड्या बिल्डरचा खेळ खल्लास

निशांत कदम असं हत्या झालेल्या 31 वर्षीय बिल्डरचं नाव आहे.

निशांत कदम असं हत्या झालेल्या 31 वर्षीय बिल्डरचं नाव आहे.

Crime in Virar: सोमवारी पहाटे श्रावण सोमवार निमित्त मंदिरात जात असताना (Attack while going to temple) विरारमधील एका बिल्डरची निर्घृण हत्या (Builder brutal murder in virar) करण्यात आली आहे.

    विरार, 07 सप्टेंबर: सोमवारी पहाटे श्रावण सोमवार निमित्त मंदिरात जात असताना (Attack while going to temple) विरारमधील एका बिल्डरची निर्घृण हत्या (Builder brutal murder in virar) करण्यात आली आहे. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दबा धरून बसलेल्या काही मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला (Attack with sharpen weapon) केला आहे. या घटनेत संबंधित बिल्डरचा जागीच मृत्यू (Builder death) झाला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. निशांत कदम असं हत्या झालेल्या 31 वर्षीय बिल्डरचं नाव असून ते चाळ बिल्डर आहेत. ते विरार पूर्वेतील सहकार नगरमध्ये वास्तव्याला असून त्यांची एन के एन्टरप्राइजेस नावाची बांधकाम कंपनी आहे. मृत कदम हे दर सोमवारी पहाटे शंकराच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असत. आरोपींना याची माहिती होती. दरम्यान काल सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास कदम शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्या दुचाकीनं निघाले होते. हेही वाचा-लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू दरम्यान गांधी चौक परिसरात काही आरोपी मृत कदम यांची वाट पाहात दबा धरून बसले होते. निशांत कदम गांधी चौक परिसरात पोहोचताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, चाळ बिल्डर निशांत कदम जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. या दुर्दैवी हल्ल्यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून या घटनेचा माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी काही अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत निशांत कदम यांनी विरार परिसरात पन्नासहून अधिक चाळी चाळी आणि इमारती बांधल्या आहेत. परिसरातील अन्य काही बिल्डरांशी त्यांचे व्यावसायिक वाद होते. तसेच सहकार नगर येथील एका जागेवरून कदम यांचे काही जणांशी वाज असल्याची माहिती मृत बिल्डर कदम यांच्या भावानं पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Virar

    पुढील बातम्या