मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लॉकडाऊनमध्ये वकिल महिलेवर स्वत:च्याच घरी बलात्कार, आरोपी गळा आवळून पळाला पण...

लॉकडाऊनमध्ये वकिल महिलेवर स्वत:च्याच घरी बलात्कार, आरोपी गळा आवळून पळाला पण...

बलात्कारानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून पळ काढला. खरंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोपीला वाटलं.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून पळ काढला. खरंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोपीला वाटलं.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून पळ काढला. खरंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोपीला वाटलं.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 23 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पण अशात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबल्या नाही. लॉकडाऊनमध्ये तरुणीवर बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला वकिलासोबत बलात्काराचं प्रकरण समोर आलं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपीने प्रथम महिलाच्या घरात प्रवेश केला. घरात एकट्या बाईला पाहून त्या व्यक्तीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून पळ काढला. खरंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोपीला वाटलं. ही घटना शुक्रवारीची आहे. त्या व्यक्तीने महिलेला धमकावलं होतं की जर तिने आवाज केला तर तो चाकूने वार करुन तिला ठार मारेल. सोनू असं आरोपीचं नाव आहे.

पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर आरोपी एका सीसीटीव्हीमध्ये दिसला, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी सोनूने चौकशीत सांगितलं की, त्याने चोरीच्या उद्देशाने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला होता. जेव्हा त्याने महिलेला एकटं पाहिलं आणि बलात्काराची घटना घडवून आणली. बलात्कारानंतर त्यानं महिला वकिलाची गळा आवळून हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं.

कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, गळा आवळल्यामुळे महिला बेशुद्ध झाली. महिला मृत असल्याचं आरोपीला वाटलं आणि त्यानंतर आरोपी महिलेचे डेबिट कार्ड, घरात ठेवलेली रोकड व काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन फरार झाला. आरोपीची जुनी गुन्हेगारी नोंद आहे. आरोपी सोनू हा तैमूर नगर, दिल्लीचा रहिवासी आहे.

पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळापासून काही अंतरावर एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला. चौकशीत महिलेनं दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येनं वाढवली चिंता, WHO ने 7 राज्यांना दिला सल्ला

First published:

Tags: Crime