मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वाढदिवसाच्या बहाण्यानं घरी बोलावलं, मग अपहरण करत बापानंच केली मुलीची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

वाढदिवसाच्या बहाण्यानं घरी बोलावलं, मग अपहरण करत बापानंच केली मुलीची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

. युवतीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील

. युवतीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील

. युवतीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील

नवी दिल्ली 29 जुलै : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात एका बापानंच आपल्या मुलीची (Father Killed Daughter) हत्या केली आहे. मुलीच्या प्रेमविवाहामुळे (Love Marriage) नाराज असलेल्या बापानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना हरियाणाच्या (Haryana) सोनीपत येथील आहे. आरोपीनं मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह मेरठजवळील कालव्यात फेकून दिला. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी (Police) यश आलं आहे.

हे प्रकरण राई ठाण्याच्या क्षेत्रातील मुकीमपूर येथील आहे. युवतीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. यानंतर आरोपीनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी युवतीचा मृतदेह कालव्यात शोधण्यास सुरुवात केली आहे. पीडितेच्या पतीनं वडील विजयपाल यांच्यासह इतर चार नातेवाईकांवर अपहरणाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यात त्यानं म्हटलं होतं, की वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं त्या दोघांना बोलावण्यात आलं होतं. तो काही अंतरावरच थांबला होता. यानंतर ठाण्याच्या समोरच त्याच्या पत्नीचं अपहरण केलं गेलं.

मद्यधुंद व्यक्तीचा तोल बिघडला अन्..., अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO

मुकीमपुर येथील रहिवासी असलेल्या तरुणीनं 2020 मध्ये शेजारीच राहाणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जात घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांचं घर गावात शेजारीच होतं. या लग्नामुळे मुलीचे कुटुंबीय नाराज होते. लग्नानंतर हे दोघंही कुठेतरी लपून राहात होते.

लग्नामुळे नाराज असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना असं सांगितलं, की आता या लग्नाला त्यांचा विरोध नाही. तसंच जुन्या गोष्टी विसरून दोघांनाही परत येण्यास सांगण्यात आलं. यानंतर दोघंही कुटुंबीयांसोबत फोनवर बोलू लागले. मुलीचे वडील विजयपाल यांनी सहा जुलै रोजी आपल्या मुलीला फोन केला आणि म्हणाले की सात जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघंही वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी या. सर्व मिळून मिठाई खायची आणि जुन्या गोष्टी विसरून नव्यानं सुरुवात करायची. मुलांकडून चुका होत असतात.

दोघंही विजयपालच्या जाळ्यात अडकले आणि आपल्या वडिलांना फोन करत आपण राई ठाण्याच्या समोर उभा असल्याचं युवतीनं सांगितलं. विजयपाल काही आरोपींसोबत कारमध्ये आला आणि आपली मुलगी कनिका हिला सहा जुलै रोजी कारमध्ये घेऊन गेला. युवतीचा पती वेदप्रकाश त्यांच्या नजरेपासून दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. दोन दिवसांनंतप मुलीच्या पतीनं आपला सासऱ्यांना फोन केला आणि पत्नीसोबत बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर त्याला असं उत्तर मिळालं, की सध्या ती झोपली आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला असता असं सांगण्यात आलं की ती आपल्या आत्याच्या घरी गेली आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा फोन केला असता ती आपल्या मावशीच्या घरी गेल्याचं सांगण्यात आलं. यानंतर वेदप्रकाशला संशय आला आणि त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली.

भाईगिरीची हौस पडली महागात; पिस्तुल घेऊन फोटो,VIDEO सोशल मीडियात शेअर केले आणि...

आरोप आहे, की ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी लवकर काहीही अॅक्शन घेतली नाही. यानंतर 20 जुलै रोजी वेदप्रकाश पुन्हा ठाण्यात गेला आणि आपल्या पत्नीच्या हत्येची आणि अपहरणाची शंका त्यानं बोलून दाखवली. यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच मुलीच्या वडिलांनी सांगितलं, की सहा जुलै रोजीच ठाण्याच्या समोरून घेऊन जात मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला. तो तिला गावी घेऊन गेला नाही. सोबतच आपल्याला या गोष्टीचा काहीही पश्चाताप नसल्याचंही त्यानं म्हटलं.

First published:
top videos

    Tags: Crime news, Marriage, Murder news