मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रक्षाबंधनच्या तोंडावर भावाने तोडले नाते, बहिणीचा गळा दाबून केला खून

रक्षाबंधनच्या तोंडावर भावाने तोडले नाते, बहिणीचा गळा दाबून केला खून

 बहिणीचा खून केल्यानंतर त्याने  स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

बहिणीचा खून केल्यानंतर त्याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

बहिणीचा खून केल्यानंतर त्याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

बुलडाणा, 28 जुलै : नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना बुलडाणा शहरात घडली आहे.  शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये सख्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण करून गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.

विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये आरोपी सागर शर्मा हा आपली बहिण अंकिता शर्मासोबत राहत होता. आज सकाळी त्याने बहिणीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात गळा आवळून खून केला. ही घटना आज सकाळी घडली.

पुण्यातील तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अंकिता शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

खुनाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी भावानेच बहिणीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खून का झाला याचा बुलडाणा शहर पोलीस तपास करीत आहे.आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार आहे. बहिणीचा खून केल्यानंतर त्याने  स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी आरोपी भावाला  ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

माढ्यात मुलाने केली बापाची हत्या

दरम्यान, नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना सोलापूरमधील माढ्यात उघड झाली. चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा मित्राच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. 20 वर्षांच्या मुलाने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

SSC Class 10th Result 2020: दहावीच्या निकालासंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी

मृत संजय काळे यांचा मुलगा आकाश संजय काळे(वय20, राहणार शिराळा) लक्ष्मण बनपट्टे, आलम बासू मुलानी( दोघेही राहणार,सुरली तालुका माढा) केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील लक्ष्मण बनपट्टे  सराईत गुन्हेगार असून त्याला खुनात साह्य करण्यासाठी सात हजारांची सुपारी देण्यात आली होती. या तिघांनी संजय काळे यांची हत्या केली आणि त्यानंतर उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत वाहनासह संजय काळे यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा उलगडा करत मुलासह तिघांना अटक केली.

First published:

Tags: Crime, बुलडाणा