Home /News /pune /

पुण्यातील तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पोलिसांनी अखेर मारेकऱ्याला पकडलं

पुण्यातील तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पोलिसांनी अखेर मारेकऱ्याला पकडलं

नात्यातील अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून या तरुणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

  पुणे, 29 जुलै : खेड तालुक्यातील भामा-आसखेड थोपटेवाडी गावात एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणीत नात्यातील एका अल्पवयीन तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचं कबूल केले आहे. 24 जुलै रोजी खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणाजवळील थोपटेवाडी येथे आरती सोपान कलवडे या तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.  या तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल केली होती. संशयित म्हणून 4 जणांना ताब्यात घेतले होते. 'आरडाओरड करू नका आधी वैचारिक गुंता सोडवा', सेनेचा भाजपच्या अध्यक्षांवर पलटवार या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत कसून चौकशी सुरू होती. या प्रकरणी जेव्हा कुटुंबातीलच काही लोकांची चौकशी केली असता धक्कादायक माहितीसमोर आली.  नात्यातील अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून या तरुणीची हत्या केल्याची कबुली दिली. हा अल्पवयीन आरोपी मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होते. या तरुणीने त्याला वारंवार स्पष्ट नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून या मुलाने तरुणीची हत्या केली आणि मृतदेह  धरणाजवळ झाडीत फेकून दिला होता. दहावीच्या निकालाआधी 10 गोष्टी करा आणि राहा टेन्शन फ्री चाकण पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. अखेर या प्रकरणी मारेकरी हा नात्यातील निघाल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune crime

पुढील बातम्या