Home /News /crime /

पार्टी होती की जत्रा? नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड, तब्बल 211 तरुण-तरुणी ताब्यात

पार्टी होती की जत्रा? नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड, तब्बल 211 तरुण-तरुणी ताब्यात

नवी मुंबई गुन्हे शाखेनं (Navi Mumbai Crime Branch)शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. शहरातील कॅफे पाम अटलांटिस या बारवर ही कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई, 08 नोव्हेंबर : लॉकडाउनच्या (Lockdown) काळात गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेले बार (bar), पब्ज (pubs) आता नियम अटींसह सुरू झाले आहे. पण, नवी मुंबई  सरकारी नियम पायदळी तुडवत बेफामपणे पब्ज आणि बार सुरू असल्याचे समोर आले. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) एका बारवर धाड टाकली असून अनधिकृत हुक्का पार्लरवर (Hookah Parlor) कारवाई केली आहे. यात तब्बल 211 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेनं शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. शहरातील कॅफे पाम अटलांटिस (Cafe Palm Atlantis bar)या बारवर ही कारवाई करण्यात आली. कॅफे पाम अटलांटिस बारमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता. शनिवारीचा सुट्टी दिवस असल्यामुळे बारमध्ये हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील 'या' गावात साजरा केला जातोय कमला हॅरिस यांचा विजय, पाहा PHOTOS याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. तेव्हा गर्दी पाहून पोलीसही हैराण झाले. या बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये तब्बल 211 तरुण, तरुणींचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. 211 तरुण-तरुणींना बार बाहेर काढताना पोलिसांची एकच दमछाक झाली होती. एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीमुळे नियम अटींसह बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बारमध्ये 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेसह परवानगी दिली आहे. पण, नवी मुंबईत सर्वच नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या बारवर अनधिकृतपणे हुक्का चालवणे, गर्दी जमवणे, कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन प्रकरणी बारवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. बारवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईत मात्र, खळबळ उडाली आहे. 'मी पहिली उपराष्ट्राध्यक्ष, अखेरची नाही', कमला हॅरिस यांनी जनतेला केलं संबोधित दरम्यान, मागील आठवड्यातच नवी मुंबईतील नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये गर्दी खेचण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र व अश्लील जाहिराती देण्यात आल्या होत्या. पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस, तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बियरची ऑफर या बारमध्ये ठेवण्यात आली होती. यासोबतच अल्कोहोल किल्स कोरोना, असा दावा करणारी जाहिरातही या बारमध्ये करण्यात आली होती. पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमधला हा प्रकार भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या