जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Railway Mega Block Update : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला ब्रेक, मुंबईत काय परिस्थितीत?

Railway Mega Block Update : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला ब्रेक, मुंबईत काय परिस्थितीत?

Railway Mega Block Update : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला ब्रेक, मुंबईत काय परिस्थितीत?

पुणे-लोणावळा तर पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गणेश दुडम(पुणे) 22 जानेवारी : मुंबईची लाईफलाईन बोलली जाणारी लोकल सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. लोकलच्या तांत्रीक कामांमुळे काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज पुणे-लोणावळा तर पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वेस्थानका दरम्यान लोहमार्गावर होणाऱ्या कामासंदर्भात हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्ग हा रस्ते वाहतुकीने करणे योग्य ठरणार आहे.

जाहिरात

पुणे शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावर रेल्वे रूळ जोडण्याबरोबर काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रद्द होणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या खालील प्रमाणे

लोणावळा पुणे लोकल सकाळ 8:20, दुपारी 14:50,15:30 आणि सायंकाळीची 17:30 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.

पुणे ते लोणावळा लोकल सकाळ 9:55, 11:17 दुपारी 15:00 वाजताची लोकल फेरी रद्द करण्यात आलीये

तळेगांव ते पुणे दरम्यान धावणारी दुपारीची 16:30 लोकल फेरी ही रद्द करण्यात आलीये.

पुणे ते तळेगांव दरम्यान धावणारी सकाळी 8:57 दुपारीची 15:42 च्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात तरी रेल प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी.

याचबरोबर आज मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घोषीत करण्यात आला आहे. मात्र मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे-वाशी मार्गावर नियमित देखभालीच्या कामासाठी, तसंच हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक महाविकासआघाडी लढणार का? अजितदादांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

ट्रान्सहार्बरवर ब्लॉक कालावधीत लोकसेवा रद्द असतील. तर हार्बरवर या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात