मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! सिक्युरिटी गार्डच्या खात्यात मोठी रक्कम असल्याची टीप, थेट केला भयानक मर्डर

धक्कादायक! सिक्युरिटी गार्डच्या खात्यात मोठी रक्कम असल्याची टीप, थेट केला भयानक मर्डर

सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाली आणि...

सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाली आणि...

सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाली आणि...

पुणे, 20 जुलै : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक परिसरातील वेअर हाऊसमधून वेअर हाऊसच्या सिक्युरिटी गार्डचं अपहरण करून खून करण्यात आलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रांजणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव औद्योगिक परिसरातील एका वेअरहाऊसमधून वेअरहाऊसच्या सेक्युरिटी गार्ड रामआसरे लालमन मिश्रा (वय वर्षे 55 मुळगाव उत्तर प्रदेश) यांचं अज्ञात व्यक्तींकडून अपहरण केल्याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला होता. त्यानुसार घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जोरदार फिरवत गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

सूत्रधार लक्ष्मण शिंदे (वय वर्ष 20 शिरसगाव काटा), विकास बाळासाहेब जगताप (वय वर्षे 21, न्हावरा) कमलेश भीमराव पवार (वय वर्ष 21 निर्वी) या तीन व्यक्तींना शिताफीने ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सिक्युरिटी गार्डचे अपहरण केल्याचे कबूल दिली तर सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटवर मोठी रक्कम असल्याची माहिती त्यानुसार आरोपीने त्याचे अपहरण करून त्याच्या एटीएम मधून पैसे काढून घेण्याचा प्लॅन आखला होता.

चिमुकलीला दूध पाजण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं डोक्यात रॉड घालून जागेवर संपवलं

मिश्रा याने एटीएममधून पैसे काढून देण्यास विरोध केल्यानं आरोपीनी त्याला जीवे मारून टाकलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह पारगाव ता. दौंड इथल्या पुलावरून भीमा नदीत पात्रात टाकून दिला होता. रांजणगाव पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह टाकलेल्या अंतरापासून तपास घेतला असता पुढील सात किलोमीटर अंतरावर वडगाव रासाई ता.शिरूर गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात मृतदेह आढळून आला.

संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांशी 'दिलकी बात' वाढदिवसाला होणार प्रसारित

पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा

याबाबत रांजणगाव पोलिसांत विकास बाळासाहेब जगताप, कमलेश विक्रम पवार आणि सुत्रधर लक्ष्मण शिंदे अशा तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत.

First published:
top videos