Home /News /crime /

Pune Crime: महिलेनं बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलाला संपवलं; अनैतिक संबंधातून पाण्यात बुडवून हत्या

Pune Crime: महिलेनं बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलाला संपवलं; अनैतिक संबंधातून पाण्यात बुडवून हत्या

Crime in Pune: चुलत बहिणीचं आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध (immoral relationship) असल्याच्या संशयातून पुण्यातील एका महिलेनं अत्यंत निर्दयी कृत्य केलं आहे.

    पुणे, 7 मे: चुलत बहिणीचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध (immoral relationship) असल्याच्या संशयातून पुण्यातील एका महिलेनं अत्यंत निर्दयी कृत्य केलं आहे. तिने आपल्या चुलत बहिणीच्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलाची पाण्यात बुडवून निर्दयीपणे हत्या (3 Year old innocent child murder) केली आहे. ही संबंधित घटना पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील लेबर कॅम्पमध्ये घडली असून आरोपी महिलेस अटक (Accused women arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत. संबंधित संशयित आरोपी महिलेचं नाव निर्मला वैलास वर्मा असून ती पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील लेबर कॅम्पमधील रहिवासी आहे. तर 3 वर्षीय मृत चिमुरड्याचं नाव चाकेन वर्मा असं आहे. याप्रकरणी मृत मुलाचे 27 वर्षीय वडील अवधेश वर्मा यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेस अटक केली आहे. फिर्यादी अवधेश वर्मा यांची पत्नी वैलाणी शर्मा आणि आरोपी महिला या चुलत बहिणी आहेत. तर फिर्यादीची पत्नी वैलाणी वर्मा यांचं आरोपी महिलेचा पती वैलास वर्मासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी महिलेस होता. यातूनच ही हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. मागील काही दिवसांपासून वैलाणी आणि वैलास यांच्यात अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय आरोपी महिलेला आला होता. याचा प्रचंड राग तिच्या मनात साठला होता. त्यामुळे तिनं आपल्या चुलत बहिणीच्या 3 वर्षाच्या निष्पाप मुलाला टार्गेट बनवलं आहे. 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आरोपी महिलेनं वैलाणी यांच्या 3 वर्षाच्या मुलाला गुपचूप उचलून नेलं. त्यानंतर तिने घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका खड्ड्यातील पाण्यात त्याला बुडवून त्याची निर्घृण हत्या केली. हे ही वाचा-प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट; असा उघड झाला प्रकार या घटनेची माहिती मिळताच लेबर कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्री उशीरा मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात जाऊन मृताच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास करताना, पोलिसांना आरोपी निर्मला वर्मा यांच्यावर संशय आला. या प्रकरणी अधिक तपास केला असता, संबंधित गुन्हा उघड झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या