यवतमाळ, 06 मे : लग्नाला अवघे चार दिवस उरले असताना भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. शित पेयातून विष (Poison) देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न यवतमाळ (Yawatmal crime news) जिल्ह्याच्या नेर येथे घडला. या संपूर्ण घटनेची कबुली खुद्द भावी पत्नीनेच दिली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्या आधारे पोलीस तपास करत आहेत. नेर तालुक्यातील कोहळा येथील किशोर परशराम राठोड या तरुणाचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील एका तरुणीशी ठरला होता. त्यांचं लग्न 19 एप्रिल ला ठरलं होतं. मात्र, तरुणीचे सोनखास येथील एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. तरुणीला त्याच्यासोबतच संसार करायचा होता. मात्र, कुटुंबाच्या शब्दाबाहेर जाता येत नाही, म्हणून तिने कोहळ्याच्या किशोर सोबतच्या लग्नाला नकार दिला नाही. परंतु, यातून मार्ग काढून लग्न तुटले पाहिजे यासाठी हरामी शक्कल लढवली गेली. संबंधित तरुणी आणि प्रियकर यांनी एक बेत आखला. हे वाचा - Coronavirus 2nd Wave: हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा ‘हाय अलर्ट’, नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या होणाऱ्या नवरदेवाला खरेदी करण्याचा बहाण्याने नेर येथे बोलावण्यात आले. तेव्हा तरुणी दोन भाऊ आणि बहिणीसोबत नेरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ती होणाऱ्या नवऱ्याला एका ज्यूस सेंटरमध्ये घेऊन गेली. ठरल्याप्रमाणे त्याला शीतपेय पिण्याचा आग्रह करण्यात आला, होणाऱ्या बायकोच्या आग्रहाखातर तरुणाने शीतपेय पिले. त्यानंतर तरुणी आपल्या बहीण-भावासह निघून गेली. काही वेळात तरुणसुद्धा तिथून निघून गेला, मात्र थोड्याच वेळात त्याला मळमळ होऊ लागली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने किशोर त्यातून पूर्णपणे बरा झाला आणि नंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत तरुणी आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेतले. तेव्हा या विष प्रयोगाचा भांडा फोड झाला. प्रियकर नववधू आणि तिच्या दोन भावासह बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.