जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Pune Beaten Case : लग्नाच्या वरातीत कोयता, हॉकी स्टीक, बांबूने मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Beaten Case : लग्नाच्या वरातीत कोयता, हॉकी स्टीक, बांबूने मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Beaten Case : लग्नाच्या वरातीत कोयता, हॉकी स्टीक, बांबूने मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात लग्नाच्या वरातीत एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. लग्नाच्या वरातीत नाचताना अचानक किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी झाली

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे,17 जानेवारी : पुण्यात लग्नाच्या वरातीत एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. लग्नाच्या वरातीत नाचताना अचानक किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी झाली. या झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन 4 जणांनी केली एका तरुणाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत कोयता, हॉकीस्टीक, बांबूचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील हडपसर परिसरातील ही घटना घडली आहे. हा प्रकार 15 जानेवारी रोजी घडला आहे. अमरदिप जाधव (वय 19) याने तरूणाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! गाडी हळू चालवा सांगितल्याने गुंड घरी, VIDEO

फिर्यादी तरुण हा सोलापूर जिल्ह्यात जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नासाठी गेला होता. लग्नावेळी फिर्यादी तरुण आणि यातील मुख्य आरोपी अमरदिप जाधव हे दोघे ही नाचत होते. नाचताना या दोघांमध्ये भांडण झाले आणि याचा राग जाधव याच्या मनात होता.

यानंतर पुण्यात 15 जानेवारी रोजी जाधव याच्यासह तीन जणांनी फिर्यादी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याला हॉकी स्टिक आणि बांबू ने मारहाण केली आणि तिथून पसार झाले. सागर सुकळे (वय 22) याच्यासह 3 अनोळखी तरुणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात कोयता गँग होतेय सक्रीय

जाहिरात

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा, असे सांगितल्याने काही सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या सराईतांनी संबंधित महिलेलाही मारहाण केली असून लहान मुलाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

जाहिरात

हे ही वाचा  :   लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष…

गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती व लहान मुले बाहेर खेळत होती. रस्त्यावरुन दुचाकीवरून काही तरुण वेगाने ये-जा करत होते. महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले असता त्याचा राग धरुन त्या तरुणांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात