मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Pune Baby Girl Thrown Canal : माता न तू वैरिणी! 15 दिवसांच्या नवजात मुलीला आईनेच फेकलं वाहत्या कालव्यात, पुण्यातील घटना

Pune Baby Girl Thrown Canal : माता न तू वैरिणी! 15 दिवसांच्या नवजात मुलीला आईनेच फेकलं वाहत्या कालव्यात, पुण्यातील घटना

आईला धक्का देऊन तिच्या 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

आईला धक्का देऊन तिच्या 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

आईला धक्का देऊन तिच्या 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

रायचंद शिंदे पुणे (जुन्नर) 05 फेब्रुवारी : जुन्नर तालुक्यातील आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नवजात मुलीला डोस देऊन माता घरी येत होती. यावेळी अज्ञात इसमाने आईला धक्का देऊन तिच्या 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना शुक्रवार (03 फेब्रुवारी) नगर-कल्याण महामार्गावर घडली होती. मात्र, आज त्या घटनेमागचे सत्य समोर आले आहे.

फक्त  15 दिवसाच्या बाळाचे अपहरण झाले नसून, स्वतः आईनेच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात फेकल्याची कबुली महिलेने पोलीस तपासात दिली. आळेफाटा पोलीस काल (दि.04) शनिवारी दिवसभर बाळाच्या मृतदेहाचा शोध घेत होते. परप्रांतीय महिलेने फेकलेले बाळ तिचे पाचवे अपत्य होते. नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या जन्मदात्या आईला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा : लोणावळ्यात चाललं काय? आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले

एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा नारा बुलंद केला जात आहे. तर दुसरीकडे मुलगी झाली की तिला नकोशी केलं जातंय. ‘आई गं.. तु वैरान का गं झालीस …!’ हेच शब्द तोंडातून येत जरी नसले तरी डोळ्यात मात्र सहज दिसत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवारी सकाळी आकाराच्या सुमारास 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण झाल्याचा कांगावा करण्यात आला. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात नवजात मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याच्या गुन्हा नोंदविला. मात्र, पोलिसांनी घटनेनंतर 24 तासांत निर्दयी आईचे बिंग फोडले आहे.

बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केले असता, घडलेल्या घटनेपासून सीसीटीव्ही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर चेक केले.  सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला ताब्यात घेत अधिक तपास केला.  नवजात  बाळाला  पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात  टाकल्याची कबुली आईने पोलिसांना दिली. 

हे ही वाचा : आईला सोडायला निघालेल्या संकेतसोबत भयानक घडलं, मित्रही गेला, अख्ख गाव रडलं

दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून, पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने केलेल्या कृत्यामागे नेमके काय कारण आहे? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातो आहे. 

महिलेला पाचवी मुलगीच झाल्याने केले हे कृत्य

या महिलेला पहिल्या तीन मुली तर चौथा मुलगा आहे. वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात सोडून दिले असावे असा संशय आहे.

First published:

Tags: Crime news, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime news