मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

PubG and Free Fire गेमसाठी लहान भावाचा घेतला जीव; प्रकरण वाचून पायाखालची जमीन सरकेल

PubG and Free Fire गेमसाठी लहान भावाचा घेतला जीव; प्रकरण वाचून पायाखालची जमीन सरकेल

यात 12 वर्षीय प्रवीणचा मृत्यू झाला.

यात 12 वर्षीय प्रवीणचा मृत्यू झाला.

सध्या शिक्षण ऑनलाइन सुरू असल्याने आपण मुलांना नवे मोबाइल फोन घेऊ दिले. यातून मुलांना गेमचं व्यसन लागलं. भविष्यातील धोका रौद्र रूप धारण करू शकतात हे या प्रकरणावरुन दिसून येतं.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 13 डिसेंबर : नागोरमधील ( Jaipur news) लाडनूमधील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलालाल 'पबजी' आणि 'फ्री फायर' (PubG and Free Fire Online Game) सारख्या खेळांचं अस्सं व्यसन लागलं होतं, की त्यात त्याने आपल्या 12 वर्षीय चुलत भावाची गळा दाबून हत्या (Murder) केली. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीतही पुरला. इतकच नाही तर आसाममध्ये असलेल्या चुलत भावाच्या काकांकडून फेक इन्स्टाग्राम आयडीवरुन मेसेज करून 5 लाख रुपयांची खंडणीही मागत होता.

सोमवारी सकाळी लाडनू पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याने सांगितल्यानुसार गावाजवळी तलावाच्या किनाऱ्यावर जमिनीत पुरलेल्या भावाचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आहे. सध्या तो मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे.

8 डिसेंबर रोजी धुंडीला गावातील प्रवीण शर्मा (12) आपल्या आईचा मोबाइल घेऊन घरातून गायब झाला होता. प्रवीणचे काका नरेश शर्मा यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यांनी सांगितलं की, प्रवीणला पबजी आणि फ्री फायर खेळण्याची सवय होती. यानंतर पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला. यादरम्यान आसाममध्ये असलेल्या प्रवीणचे काका यांना इन्स्टाग्रामवरुन मेसेज आला की, प्रवीण त्या व्यक्तीकडे आहे. तो दिल्लीत आहे. तो जिवंत हवा असेल तर 5 लाख रुपये द्या. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत कळवल.

तपासात IP लोकेशन धुंडीला गावात दिसली...

पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास केल्यानंतर तो इन्स्टाग्राम आयडी धुंडीला गावातील असल्याचं दिसून आलं. या मोबाइलमध्ये दुसऱ्या मोबाइलच्या हॉटस्पॉटवरुन इंटरनेट चालवलं जात होतं. याचा तपास केल्यानंतर प्रवीणचा अल्पवयीन चुलत भावावर संशय़ आहे. त्याची चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला.

प्रवीणला जमिनीत गाडलं...

पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलाने सांगितलं की, मोबाइलमध्ये पबजी, फ्री फायर आणि तीन पत्तीसारखे गेम खेळतो. यात सातत्याने हरत असल्याने त्याच्यावर कर्ज झालं होतं. त्याला इतरही व्यसन होतं. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. मृत प्रवीणदेखील त्याच्यासोबत गेम खेळत होता. यामुळे त्याने तलावाशेजारी त्याची गळा दाबून हत्या केली. त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. मृतदेह जमिनीत पुरण्याचंही काम त्या अल्पवयीन मुलाने केलं. यानंतर आरोपीने प्रवीणच्या मोबाइलच सिम काढून फेकून दिलं. इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार केलं. दुसऱ्या मोबाइल नेटवर्कवरुन हॉटस्पॉट घेऊ आसाममध्ये राहणाऱ्या प्रवीणच्या काकांना खंडणीचे पैसे मागितले.

हे ही वाचा-निवडणूक हरला म्हणून उमेदवाराने मतदारांनाच दिली शिक्षा; Video समोर आल्यानंतर अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पबजी, फ्री फायर सारख्या ऑनलाइन खेळात स्वत:चे वॉलेट असतात. जे पेटीएम आणि कार्डाच्या मदतीने रिचार्ज केलं जातं. वॉलेटमधील पैशांच्या मदतीने गेम विविध पातळीवर खेळला जातो. याशिवाय आपल्या कॅरेक्टरसाठी कपडे, बंदुका आदींची खरेगी केली जाते. ज्याची किंमत हजारों रुपयांपर्यंत असतं. अशाप्रकारे ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठीही अॅपमध्ये पैसे टाकावे लागतात. आरोपी अशा प्रकारे ऑनलाइन गेममध्ये पैसे वाया घालवीत होता. यासाठी त्याने आजूबाजूच्या लोकांकडून पैसे कर्जाऊ घेतले होते.

First published:

Tags: Murder, Online crime, Rajasthan