मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फ्लॅट पाहण्याच्या बहाण्यानं मित्रानंच साधला डाव; प्रॉपर्टी ब्रोकर महिलेवर बलात्कार

फ्लॅट पाहण्याच्या बहाण्यानं मित्रानंच साधला डाव; प्रॉपर्टी ब्रोकर महिलेवर बलात्कार

एका प्रॉपर्टी ब्रोकरला प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका प्रॉपर्टी ब्रोकरला प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका प्रॉपर्टी ब्रोकरला प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

ग्वालियर, 7 डिसेंबर: प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय करणाऱ्या (Property broker woman) महिलेला तिच्याच मित्राने फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने (Rape) बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याला एक फ्लॅट भाड्याने (Rented flat) घ्यायचा आहे, असं सांगत तो फ्लॅट पाहण्यासाठी मित्राने तिला बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केले. या कृष्णकृत्यात (Friend of accused) त्याचा मित्रदेखील सहभागी होता.

फ्लॅट दाखवण्याचा बहाणा

मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणारी 27 वर्षांची तरुणी प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय करत होती. गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात तिचा जम बसला होता. आतापर्यंत पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या या व्यवसायात ती सेटल होत होती आणि वेगवेगळ्या ठिकाणचे क्लायंट्स तिला भेटून आपल्या जागेचे व्यवहार करण्यासाठी तिची मदत घेत होते. याच दरम्यान, अनिल शर्मा उर्फ कृष्णा नामक तरुणासोबत तीच ओळख झाली होती. बस ऑपरेटरचं काम करणाऱ्या अनिलनं एक दिवस महिलेला प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्यानं बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला.

महिलेला केला फोन

अनिलनं महिलेला फोन करून आपल्याला एक घर भाड्याने घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. काही दिवसांनी त्याने महिलेला पुन्हा फोन केला आणि आपण एक फ्लॅट निश्चित केला असून फ्लॅट पाहायला येण्याची विनंती केली. तिला फ्लॅटचा पत्तादेखील दिला. महिला आपल्या स्कुटीवरून दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. त्यानंतर तिला त्याने पाणी म्हणून गुंगीचं औषध दिलं. औषध प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर अनिल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी एका मित्राने महिलेवर अत्याचार केले.

हे वाचा- हुंड्यात हवी होती फॉर्च्युनर, तरुणीच्या तक्रारीनंतर वरात थेट पोलीस ठाण्यात

महिलेला दिली धमकी

महिला शुद्धीत आल्यानंतर दोघांनी तिला ही बाब जाहीर न करण्याची धमकी दिली. तिची स्कुटीदेखील त्यांनी ठेऊन घेतली आणि महिलेला तिथून हाकलून दिलं. महिलेनं त्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना गजाआड केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Friendship, Police, Property, Rape