Home /News /crime /

हुंड्यात हवी होती फॉर्च्युनर, तरुणीच्या तक्रारीनंतर वरात थेट पोलीस ठाण्यात

हुंड्यात हवी होती फॉर्च्युनर, तरुणीच्या तक्रारीनंतर वरात थेट पोलीस ठाण्यात

लग्नाचे विधी सुरु असताना अचानक हुंड्याची मागणी करत लग्न रोखून धरणाऱ्या वराकडील मंडळींना तरुणीनं चांगलाच धडा शिकवला. हुंडा मागणाऱ्या लोभी तरुणाशी कधीही लग्न न करण्याचा निर्धार तिनं व्यक्त केला.

    चंदिगढ, 7 डिसेंबर: लग्नसोहळा सुरु असताना हुंड्यात (Fortuner car as dowry) फॉर्च्युनर गाडीची मागणी करणाऱ्या आणि अडून बसणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना (Groom and his relatives) तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली. हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा असला (Legal offence) तरी आजही समाजात ही प्रथा सुरु असल्याचं दिसतं. विशेषतः समाजातील उच्चशिक्षित वर्गातदेखील हुंड्यावरून महिलांवर अत्याचार झाल्याच्या (Harassment related to dowry) घटना घडतात. नुकत्याच समोर आलेल्या घटनेमध्ये लग्न मध्यावर आलं असताना हुंड्यासाठी अडून बसलेल्या सासरच्या मंडळींना पोलीस स्टेशन दाखवण्याशिवाय कुठलाच पर्याय महिलेकडं उरला नाही. मध्यरात्री हुंड्याची मागणी हरियाणातील करनालमध्ये लग्नसोहळा सुरु होता. कृषी विभागात वैज्ञानिक असणारा मुलगा आणि कायदेशीर सल्लागार असणारी वकील मुलगी यांचं एकमेकांशी लग्न होत होतं. या लग्नात वऱ्हाडी मंडळी जमून कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. अचानक मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला लग्नाचे विधी थांबवण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली. सासरच्या मंडळींपैकी काहीजणांना भेटवस्तू न दिल्यामुळे ही मंडळी नाराज झाली होती. यामुळे आपलं नाक कापलं गेल्याची तक्रार मुलाकडच्या नातेवाईकांनी केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुलीचे वडील करत होते. मात्र त्याचं काहीही न ऐकता आपला घोषा सासरच्या मंडळींनी लावून धरला होता. फॉर्च्युनरची केली मागणी पाहुण्यांच्या मानपानावरून सुरू झालेला हा वाद शेवटी फॉर्च्युनर गाडीपर्यंत जाऊन पोहोचला. आपल्याला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी हवी असल्याची नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी केली. त्यावर हा प्रकार असह्य झालेल्या तरुणीनं पोलीस स्टेशनला धाव घेण्याचा निर्णय़ घेतला. सासरच्या मंडळींपैकी एकानं आपण पोलीस अधिकारी असून कायदेशीर बाबी आपण मॅनेज करू शकतो, अशी तंबी तरुणीला दिली. मात्र वकील असणाऱ्या तरूणीने पोलिसांत धाव घेत हुंड्याची मागणी केल्याचा आणि लग्नाचा आश्वासन देऊन फसवणूक केल्याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. हे वाचा- जितेंद्र आव्हाडांनी घालून दिला आदर्श, मुलीचे केले रजिस्टर लग्न! तरुणीची कैफियत जर आपल्यासारख्या वकील असणाऱ्या सुशिक्षित मुलीच्या बाबतीत हा प्रकार होत असेल, तर गरीब आणि अशिक्षित घरात काय होत असेल, असा सवाल तरुणीनं उपस्थित केला आहे. हुंडा घेणाऱ्या लोभी तरुणाशी कधीही विवाह करणार नसल्याचं सांगत तिनं कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Marriage, Police

    पुढील बातम्या