मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अंत्यसंस्कार सुरु असतानाच पोहोचले पोलीस, चिता विझवून घेऊन गेले मृतदेह

अंत्यसंस्कार सुरु असतानाच पोहोचले पोलीस, चिता विझवून घेऊन गेले मृतदेह

महिलेवर (woman) तिच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार (funeral) सुरू असतानाच पोलिसांनी (police) चिता विझवून मृतदेह (dead body) तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.

महिलेवर (woman) तिच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार (funeral) सुरू असतानाच पोलिसांनी (police) चिता विझवून मृतदेह (dead body) तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.

महिलेवर (woman) तिच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार (funeral) सुरू असतानाच पोलिसांनी (police) चिता विझवून मृतदेह (dead body) तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

लुधियाना, 23 ऑगस्ट : महिलेवर (woman) तिच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार (funeral) सुरू असतानाच पोलिसांनी (police) चिता विझवून मृतदेह (dead body) तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. एका महिलेची सासरच्यांनी हत्या (murder) करून पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.

अशी घडली घटना

हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील माजरा नावाच्या गावात एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून समजली. सासरच्या मंडळींनी सुनेचा खून केल्याचं पोलिसांना समजलं. पुरावे मिटवण्यासाठी सूनेवर घाईघाईनं अंत्यसंस्कार होत असल्याचं समजताच पोलीस अग्निशमन दलाचा बंब घेऊनच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्मशानात पोहोचून अंत्यसंस्कार थांबवण्याची सूचना केली. मात्र तोपर्यंत चितेचा अग्नी देण्यात आला होता आणि लाकडांनी पेट घेतला होता. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या बंबाच्या मदतीनं तातडीनं ही चिता विझवली आणि मृतदेह ताब्यात घेतला. सध्या सरकारी हॉस्पिटलच्या शवागारात हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ठेवण्यात आला असून याबाबत अधिक तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच याबाबत काही अधिक माहिती मिळू शकेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

फॉरेन्सिक टीमलाही पाचारण

स्मशानभूमीत पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी बोलावलं होतं. मृतदेहाची तपासणी करून काही महत्वपूर्ण पुरावे आणि धागेदोरे मिळतात का, याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पंचनामा आणि इतर औपचारिक बाबी पूर्ण केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

हे वाचा -पत्नी आणि सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी CRPF जवानाने केलं असं कृत्य

पोलीस पाहतायत तक्रारदाराची वाट

पोलिसांनी या प्रकरणी सध्या वाट पाहण्याची भूमिका घेतली असल्याचं समजतं आहे. जोपर्यंत या महिलेच्या मृत्यूबाबत तक्रार दाखल करायला कुणी येत नाही किंवा तिच्या हत्येबाबत काही पुरावा सापडत नाही, तोपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. ज्या व्यक्तीने या महिलेच्या हत्येची बातमी दिली, त्या व्यक्तीचाही पोलीस शोध घेत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती कुठलाही ठोस पुरावा लागलेला नसून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

First published:

Tags: Dead body, Funeral, Police, Woman dead body