• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पत्नी आणि सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी CRPF जवानाने केलं असं कृत्य; आता सरकारी नोकरी धोक्यात

पत्नी आणि सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी CRPF जवानाने केलं असं कृत्य; आता सरकारी नोकरी धोक्यात

पत्नी आणि सासरच्या मंडळींना इम्प्रेस करणं जवानाला भारी पडलं आहे.

 • Share this:
  गुवाहाटी, 23 ऑगस्ट : गर्लफ्रेंड किंवा पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. मात्र तुम्ही कधी ऐकलं आहे का एखाद्याने पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी आपली सरकारी नोकरी धोक्यात घातली. मात्र असा प्रकार घडला आहे. आसाममधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका सीआरपीएफच्या जवानाला चेतावणी देत संबंधित कारवाई केल्यानंतर सोडण्यात आलं. आसाममधील नगाव जिल्ह्यात पोलिसांनी एका जवानाला सैन्याची वर्दी घालण्याच्या आरोपाखाली पकडलं होतं. या जवानाचं नाव यतेंद्र सिंह असल्याचं समोर आलं आहे. मिलिट्री इन्टेलिजन्सकडून मिळाली माहितीॉ शहरातील सीनियर पोलीस अधिकाऱ्यानी रविवारी या गोष्टीची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, ‘मिलिट्री इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सीआरपीएफ जवानाला एका महिलेसोबत पकडलं होतं. चौकशी आणि ओळख पटल्यानंतर हा सर्व प्रकार संशयास्पद नसल्याचं समोर आला आणि ती महिला सीआरपीएफ जवानाची पत्नी असल्याचं समोर आलं. (An act done by a CRPF jawan to impress his wife now his government job is in danger) हे ही वाचा-वजन कमी करण्यासाठी दिलं भलतंच इंजेक्शन; जिम ट्रेनरचं तरुणीसोबत घृणास्पद कृत्य मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीआरपीएफचा हा कर्मचारी 2017 मध्ये या दलाशी जोडला गेला होता. यानंतर त्याची पोस्टिंग आसामच्या (Assam) बाहेर होती. अर्थात तो भारतीय सैन्याचा (Indian Army) भाग होऊ इच्छित होता आणि अनेक वेळा विविध ठिकाणी पत्नी आणि सासरच्या मंडळींना प्रभावित करण्यासाठी तो सैन्याची वर्दी घालत होता. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जवानाला अटक केलेली नाही. त्याला समजावून घऱी पाठविण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: