इस्लामाबाद, 17 जुलै : एका महिलेनी आपल्या पतीच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी असा काही प्लान आखला, जो उघड झाल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले (Pakistan wife revenge plan). तब्बल तीन वर्षं मेहनत करुन अखेर तिने आपली खूनी योजना अंमलात आणली. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
ही घटना खरंतर पाकिस्तानातील आहे. कबायली प्रदेशातील बाजौर जिल्ह्यात एका व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पण हा नैसर्गिक मृत्यू होता की त्याची हत्या करण्यात आली हे स्पष्ट झालं नव्हतं. यानंतर या महिलेने स्वतःच आपल्या पतीच्या मृत्यूबाबत तपास सुरू केला. यात तिला समजलं, की तिच्या पतीचा मित्र गुलिस्तान खान यानेच विषारी इंजेक्शनचा वापर करुन तिच्या पतीची हत्या केली आहे. हे समजताच तिनं ठरवलं, की गुलिस्तानने आपल्या पतीला मारलं, त्यामुळे आपणही गुलिस्तानचा काटा काढायचा. (Wife takes revenge of husband’s death).
यानंतर सुमारे पाच-सहा महिन्यांपर्यंत ती गुलिस्तानला मारण्याचा प्रयत्न करत राहिली. मात्र तिला कधीच यश आलं नाही. मग तिने गुलिस्तानशी जवळीक साधण्याचा निर्णय घेतला. गुलिस्तानला अगोदरच एक पत्नी आणि एक मुलगा होता. मात्र, या महिलेने पैसे, गाडी अशा गोष्टींचं आमिष देऊन गुलिस्तानला आपल्या जाळ्यात अडकवलं. तिने गुलिस्तानला आपल्यासोबत लग्न करण्यासाठीही तयार करुन घेतलं (Pakistan Wife married husbands killer).
हे ही वाचा-Right to Love चा कुटुंबाकडून विरोध;12वीच्या विद्यार्थिनीचं उचललं धक्कादायक पाऊल
लग्नानंतर गुलिस्तान आणि ही महिला एकाच घरात राहू लागले. मग तिने गुलिस्तानला सुरक्षेच्या कारणास्तव एक पिस्तुलही खरेदी करण्यास भाग पाडलं. यानंतर एक दिवस रात्री गुलिस्तान झोपल्यानंतरही ही महिला जागीच होती. ती दुसऱ्या खोलीत गेली, जिथे पिस्तुल ठेवलं होतं. ते पिस्तुल घेऊन ती पुन्हा आपल्या खोलीत आली, आणि समोर पलंगावर झोपलेल्या गुलिस्तानवर तिने गोळी झाडली.
पण, बंदुकीतून गोळी बाहेरच आली नाही. त्यामुळे घाबरुन ही महिला दुसऱ्या खोलीत पळून गेली. यानंतर तिने पिस्तुल तपासली, आणि पुन्हा एकदा आपल्या खोलीमध्ये आली. यावेळी मात्र तिने झाडलेल्या गोळीने गुलिस्तानचे आयुष्य संपवले. तिने पहिली गोळी गुलिस्तानच्या डोक्यात आणि दुसरी शरीराच्या उजव्या बाजूला मारली. यानंतर ती सकाळपर्यंत तिथेच बसून राहिली, आणि सकाळ होताच तिने लोकांना सांगितलं की कोणीतरी गोळ्या झाडून आपल्या पतीची हत्या केली आहे.
महिलेने कांगावा केला असला, तरी पोलीस तपासात सत्य समोर आलंच. यानंतर या महिलेला न्यायालयात सादर करण्यात आलं. तिथून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. या महिलेने हत्येसाठी वापरलेलं पिस्तुलही पोलिसांनी जप्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Murder, Wife and husband