मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई-लेकीने सुपारी देऊन पोलीस हवालदार असलेल्या वडिलांचा गळा चिरला, गडचिरोली हादरलं

आई-लेकीने सुपारी देऊन पोलीस हवालदार असलेल्या वडिलांचा गळा चिरला, गडचिरोली हादरलं

या खळबळजनक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मृतक हवालदार सिडाम यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी सिडाम सामील असल्याचे आढळले.

या खळबळजनक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मृतक हवालदार सिडाम यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी सिडाम सामील असल्याचे आढळले.

या खळबळजनक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मृतक हवालदार सिडाम यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी सिडाम सामील असल्याचे आढळले.

गडचिरोली, 17 जुलै : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात अहेरी तालुक्यात धोंडराज पोलीस मदत केंद्रातील हवालदार (Police constable) जगन्नाथ सिडाम ( Jagannath Sidham) यांच्या हत्येप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी त्याच्या सुशिक्षित मुलीसह पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. आई आणि मुलीने सुपारी देऊन आपल्याच नवऱ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

जगन्नाथ सिडाम हे पोलीस हवालदार भामरागड तालुक्यात धोडराज येथे वाहनचालक पदावर कार्यरत होते. आलापल्ली हे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातलं मध्यवर्ती शहर आहे. आलापल्ली लागून नागापल्ली येथील घरात जगन्नाथ सिडाम झोपले असताना अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांचा दरवाजा ठोठावून त्यांना उठवले, त्यानंतर धारदार चाकूने त्यांचा गळा कापून त्या ठिकाणी फेकून दिला. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला नेण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता.

पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर.., बीडमध्येच ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून ऑफर

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी भेट देऊन हत्येची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी सुरू झाली होती. याठिकाणी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र पोलीस हवालदार यांची हत्या नेमकी कशामुळे झाली हे सुरुवातीला स्पष्ट झाले नव्हते.

दरम्यान, आज  पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम याच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि मुलीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात पत्नी आणि मुलीच्या अटकेने, समाजमन ढवळून निघाले आहे. या संदर्भात पोलीस चौकशीत इंद्रजीत खोब्रागडे या तरुणाला  पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी केली असता जी नावे बाहेर आली त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते.

तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य?

या खळबळजनक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मृतक हवालदार सिडाम यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी सिडाम सामील असल्याचे आढळले. या दोघींनी संगनमताने इंद्रजीत खोब्रागडे याला सुपारी देऊन आपल्याच वडिलांची हत्या करवल्याचे तपासात उघड झाले आहे.  नेहमी होणाऱ्या घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समोर आलं आहे.  पत्नी आणि मुलीनेच हे कृत्य केल्याचे  प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांमध्ये आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.  त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: Mother