Home /News /crime /

17 वर्षांपासून फरार होत्या 8 महिला गुन्हेगार; प्लास्टिक सर्जरी करून चेहरा आणि नावही बदललं, पण अखेर...

17 वर्षांपासून फरार होत्या 8 महिला गुन्हेगार; प्लास्टिक सर्जरी करून चेहरा आणि नावही बदललं, पण अखेर...

किलांटनमध्ये राहणाऱ्या आठ महिलांनी गुन्हा केल्यानंतर प्लास्टिक सर्जरी करून त्यांची ओळख बदलली. पोलीस गेल्या 17 वर्षांपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र या महिला आपला चेहरा बदलून आरामात पोलिसांसमोर फिरत होत्या.

    नवी दिल्ली 27 एप्रिल : पूर्वीच्या काळी प्लास्टिक सर्जरी ही मोठी गोष्ट होती. त्यावेळी यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागायचे. त्यामुळे लोक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच हे उपचार घेत असत. चेहऱ्यावर जखम झाली असेल किंवा चेहरा खराब होत असेल तरच प्लास्टिक सर्जरी केली जायची. पण बदलत्या काळानुसार प्लास्टिक सर्जरी अगदी कॉमन झाली आह. तसंच, त्याच्या कमी शुल्कामुळे बरेच लोक अगदी सहज प्लास्टिक सर्जरी करून घेतात. याचाच वापर करून मलेशियामध्ये राहाणाऱ्या काही चोर महिला 17 वर्षांपासून पोलिसांना चकमा देत आहेत (8 Criminal Women Change their Identity through Plastic Surgery). लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीनं नवरदेवाला चपलीनं चोपलं; पतीवर केला गंभीर आरोप आजच्या काळात मलेशियातील गुन्हेगारांमध्ये प्लास्टिक सर्जरी अतिशय कॉमन बाब झाली आहे. अनेक गुन्हेगार यातून आपला चेहरामोहरा बदलून पोलिसांना सहज चकमा देतात. मलेशियन मीडिया हरियान मेट्रोमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, किलांटनमध्ये राहणाऱ्या आठ महिलांनी गुन्हा केल्यानंतर प्लास्टिक सर्जरी करून त्यांची ओळख बदलली. पोलीस गेल्या 17 वर्षांपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र या महिला आपला चेहरा बदलून आरामात पोलिसांसमोर फिरत होत्या. याचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, या सर्व महिला अत्यंत घृणास्पद गुन्ह्यात सामील होत्या. यामध्ये खुनापासून, चोरी, दरोड्यापर्यंतचा समावेश आहे. या सर्व गुन्हेगार सतरा वर्षांपासून पोलिसांना सापडत नव्हत्या, असं किलांटन पोलीस प्रमुख दातुक शफीन ममत यांनी सांगितलं. त्या अजूनही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाही. या सर्व किलांटनमध्ये लपलेल्या असल्याचं पोलिसांना वाटत आहे. मात्र आता त्यांच्या प्लास्टिक सर्जरीची माहिती पोलिसांना मिळाल्याचं समजल्याने त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतील असा अंदाज आहे. एकतर्फी प्रेमातून तिहेरी हत्याकांड! आई वडिलांसह मुलीला रस्त्यात गाठलं, धारधार शस्त्राने केले वार अन्... यातील अनेक जण थायलंडमध्ये स्थायिक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांनी केवळ आपला चेहराच बदलला नाही तर त्यांची ओळख देखील बदलली आहे, ज्यामध्ये त्यांचं नावदेखील आहे. अनेक वर्षे रुग्णालयांत तपास केल्यानंतर पोलिसांना या गुन्हेगारांचा नवा चेहरा सापडला आहे. आता त्यांचे फोटो देशाच्या विविध भागात पाठवून लोकांनाही त्यांना शोधण्याचं आवाहन केलं जात आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कोणीही सहकार्य केलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Surgery

    पुढील बातम्या