मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीनं नवरदेवाला चपलीनं चोपलं; पतीवर केला गंभीर आरोप

लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीनं नवरदेवाला चपलीनं चोपलं; पतीवर केला गंभीर आरोप

नवरदेवाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने त्यांना चपलीनं मारहाण केली.

नवरदेवाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने त्यांना चपलीनं मारहाण केली.

नवरदेवाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने त्यांना चपलीनं मारहाण केली.

पाटणा 27 एप्रिल : लग्नानंतरची पहिली रात्र नवविवाहित जोडप्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. या प्रसंगी पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात. पण आज आम्‍ही तुम्‍हाला हनीमूनचा असा एक किस्‍सा सांगणार आहोत, जो यापेक्षा अगदी उलट आहे. नवरदेवाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने त्यांना चपलीनं मारहाण केली (Bride Beaten Groom on First Night after Wedding). तर नवरीकडच्यांचा दावा आहे, की सासरकडच्यांनी नवरीला घराबाहेर काढलं.

या घटनेनंतर नवरी आपल्या आई-वडिलांसह नवरदेवाच्या घराबाहेर ठाण मांडून बसली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिक, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नवरी आणि नवरदेवाकडचे लोक आपल्याआपल्या मुद्द्यांवर अडून असल्यामुळे प्रकरण आणखीच वाढत चाललं आहे.

मुंबईतील युवकाने गाठला कळस; छत्तीसगडमध्ये जात फेसबुक फ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घराबाहेर त्यांची सून तिच्या आई-वडिलांसोबत दोन दिवसांपासून धरण्यावर बसली आहे. सुनेचा आरोप आहे की तिला सासरच्या घरी राहायचं आहे, पण सासरचे लोक तिला घरात ठेवायला तयार नाहीत. सुनेसोबतच तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईकही धरण्यावर बसले आहेत. दुसरीकडे, निवृत्त रेल्वे अधिकारी विजय सिंह, त्यांची पत्नी चमेली देवी आणि मुलगा रोहित यांचा आरोप आहे की, धरण्यावर बसण्याच्या नावाखाली सून आणि तिच्या कुटुंबीयांनी घराचे वीज कनेक्शन तोडले आहे. पाणीपुरवठा बंद केला.

हा वाद आणि प्रकरण पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यातही पोहोचलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे, पण एकही बाजू झुकायला तयार नाही. स्थानिक लोकांसाठीही ही बाब अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. हे प्रकरण मिटावे, अशी परिसरातील नागरिकांची इच्छा आहे, मात्र दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

राँग नंबरवरील एका फोनमुळे सुरू झाली Love Story; आता पोलिसांकडे मदत मागतीये 3 मुलांची आई

2019 मध्ये स्मिताचं रोहितसोबत लग्न झालं होते. स्मिताचा आरोप आहे की, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर सासरच्यांनी तिला जबरदस्तीने घराबाहेर काढलं. वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी दिल्याचा तिचा दावा आहे. दुसरीकडे स्मिताच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे की हनिमूनच्या रात्रीच स्मिताने रोहित आणि त्याच्या मुलीला सँडलने मारहाण केली होती. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. स्थानिक लोकही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Wedding