Home /News /crime /

एकतर्फी प्रेमातून तिहेरी हत्याकांड! आई वडिलांसह मुलीला रस्त्यात गाठलं, धारधार शस्त्राने केले वार अन्...

एकतर्फी प्रेमातून तिहेरी हत्याकांड! आई वडिलांसह मुलीला रस्त्यात गाठलं, धारधार शस्त्राने केले वार अन्...

UP crime: उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एकतर्फी प्रेमात अपयशी ठरल्याने एका तरुणाने तिहेरी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

    गोरखपूर, 26 एप्रिल : उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एकतर्फी प्रेमात अपयशी ठरल्याने एका तरुणाने तिहेरी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वेड्या प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून तरुणी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली. त्याचवेळी पोलिसांच्या तत्परतेमुळे मारेकर्‍याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. ही घटना खोराबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगंज भागातील आहे. भररस्त्यात केले वार खोराबार पोलीस स्टेशन हद्दीतील रायगंज गावात राहणारे गामा निषाद हे बंगला चौकात कुटुंबासोबत राहत होते. तर गामा यांचे मोठे भाऊ रमा निषाद रायगंजमध्ये राहतात. रमा निषाद यांच्या मोठ्या मुलीचे लग्न होत असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी कुटुंबात मटकोडवा समारंभ होणार होता. त्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गामा रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पत्नी संजू आणि मुलगी प्रीतीसह पायी जात होते. घरापासून सुमारे 800 मीटर अंतरावर वाटेत हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने संपूर्ण कुटुंबाला घेरले. गामा यांना काही समजू शकेल त्याआधीच हल्लेखोराने प्रीतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याचवेळी मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. धारदार शस्त्राने जखमी झालेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे वाचा - मुंबईतील युवकाने गाठला कळस; छत्तीसगडमध्ये जात फेसबुक फ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य आरोपीला अटक घटनेची माहिती मिळताच एसएसपी डॉ विपिन टांडा, एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई, सीओ कैन्ट श्यामदेव घटनास्थळी पोहोचले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबरोबरच एहतियातन गावात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. एसएसपी यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी अलोक पासवान याला अटक करण्यात आली आहे. तो संतकबीर नगर येथील राहणारा आहे आणि खोराबार मध्ये आपल्या मामा महेंद्र पासवान यांच्या घरी राहत होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Up crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या