मुंबई 06 ऑगस्ट : मुंबईतून एक अतिशय आगळीवेगळी घटना समोर आली आहे. यात 9 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. अखेर तिला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. ९ वर्षांपूर्वी शाळेतून घरी येत असताना अंधेरी येथे एक अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं. मात्र, आता डी.एन नगर पोलिसांनी नऊ वर्षांनी या मुलीची सुखरूप सुटका केली आहे. या मुलीला शोधून काढण्यात पोलिसांना ९ वर्षांनी यश आलं आहे.
'पत्नी पीडित पती' संघटनेच्या नेत्याला 4 वर्षांपासून पत्नीकडून मारहाण, शेवटी सहन झालं नाही अन्
अपहरण झालं तेव्हा 2013 साली पुजा दुसरीत शिकत होती. ती अंधेरीच्या गिल्बर्ट हिल इथे राहायची. एक दिवस शाळेतून घरी परत येत असताना हॅरी नावाच्या व्यक्तीने तिचं अपहरण केलं. पुजा बराच वेळ घरी न आल्याने चौकशीसाठी तिचे कुटुंबीय शाळेत पोहोचले. मात्र, शाळा सुटल्यावर ती घरी गेली असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. बराच वेळ पुजाचा शोध न लागल्याने कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरात पोस्टरही लावले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. अखेर 9 वर्षांनंतर विलेपार्लेच्या नेहरूनगर झोपडपट्टीत एक अल्पवयीन मुलगी राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांना मिळाली. याची सत्यता पडताळून अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांना या मुलीची माहिती मिळाली. परंतु यात ती नेमक्या कोणत्या घरात आहे हे समजत नव्हतं. अखेर पोलिसांना एक घर दिसलं. या घरातून पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं. नऊ वर्षांपूर्वी अपहरण झालेली ही तीच मुलगी असल्याचं उघड झालं.
याप्रकरणी अपहरण करणाऱ्या हॅरी जोसेफ डिसोझाला पोलिसांनी अटक केली आहे. मूल होत नसल्याने त्याने या मुलीचे अपहरण केल्याचं तपासात समोर आलं. अपहरणानंतर मुंबईत आणल्यावर हॅरी पूजाला दम देऊन तिला घरातच कोंडून ठेवायचा. तो तिला घराबाहेर पडू देत नव्हता. तसंच त्याने पूजाला घरकामासाठी जुंपलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे. हॅरी एसी रिपेरिंगचे काम करतो. त्याला मूल होत नसल्याने त्याने पूजाचं अपहरण केलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून हॅरीने त्याच्या पत्नीला आणि पूजाला गावी पाठवलं. गावी ती चार वर्षे शाळा शिकली. खर्च परवडत नसल्याने त्याने पूजाला आणि पत्नीला मुंबईत बोलावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kidnapping