गांधीनगर, 5 ऑगस्ट : दररोज घरात होणारा वाद आणि कथितरित्या पत्नीकडून होणाऱ्या मारहाणीनंतर गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 32 वर्षीय एका व्यक्तीने 1 जुलै रोजी साबरमतीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने साबरमती रिवरफ्रंड पोलिसांकडे एफआयआर दाखल करीत आरोप केला आहे की, मृत व्यक्तीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपला जीव दिला. मृत किर्ती देवडा पत्नी अत्याचार विरोधी संघात काम करीत होता. ही संघटना त्याचे काका दशरथ देवडा चालवित होते.
तक्रारकर्ता मनोज देवडाने सांगितलं की, त्याचा छोटा भाऊ किर्तीचं लग्न 2016 मध्ये पुष्पा राठोडसोबत झालं होतं. दोन वर्षांपर्यंत सर्व ठीक सुरू होतं. मात्र यानंतर पुष्पा पतीसोबत खूप वाद घालत होती. छोट्या छोट्या कारणांवरुन दोघांमध्ये भांडण होतं. यात किर्तीला पत्नी मारत होती. मनोजने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 30 जून रोजी पुष्पा आपला पती किर्तीला घरातील झाडून मारहाण करू लागली. मनोजने पुष्पाच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि तिला माहेरी घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र पुष्पाने जाण्यास नकार दिला.
1 जुलै रोजी किर्ती पत्नी पुष्पाला तिच्या घरी सोडून आला. मात्र यानंतर तो आपल्या घरी परतला नाही. त्याच दिवशी त्याचा मृतदेह साबरमती नदीत सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येदरम्यान भिजलेला मोबाइल जेव्हा पोलिसांनी ठीक केला तर त्यात एक व्हिडीओही दिसला. ज्यात त्याने पत्नीकडून छळ होत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी किर्तीची पत्नी पुष्पा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.