बंगळुरू, 5 ऑगस्ट : कर्नाटकातील बंगळुरूतून अत्यंत क्लेशकारक बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन फेकून दिल्याचा व्हिडीओ पाहून पायाखालची जमिन सरकेल. जी आई आपल्या बाळाला 9 महिने गर्भात वाढवते, अशा या आईनेच आपल्या मुलाला मृत्यूच्या जबड्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या महिलेचा नाव सुषमा असून ती व्यवसायाने डॉक्टर (दंतचिकित्सक) आहे. तर तिचा पती व्यवसायाने इंजिनियर आहे. हे कुटुंब बंगळुरुत राहतं. या महिलेने आपल्या 4 वर्षांचा मुलगा जिती याला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. तिचा मुलगा गतीमंद होता. गतीमंद-मतिमंद मुलाला वाढवण्यात महिला त्रासली होती. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या मुलाला बंगळुरू रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं. मात्र यानंतर तिचा पती मुलाला घरी घेऊन आला.
मात्र शेवटी तिने मुलाला चौथ्या मजल्यावरुन फेकून दिलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यामध्ये दिसून येत आहे की, आधी महिला मुलाला गॅलरीत घेऊन येते. मुलगा खांद्यावर असताना ती इमारतीच्या खाली डोकावून पाहते. यानंतर ती मुलाला गॅलरीच्या कठड्यावर ठेवते. यानंतर पुन्हा त्याला आत घेते. थोड्या वेळाने आईच मुलाला खाली फेकून देते. मुलगा खाली पडल्याच पाहिल्यानंतर ती देखील गॅलरीवर उभी राहते. ती बराच वेळ थांबून राहते. तीदेखील खाली उडी मारण्याच्या तयारीत असताना काही जणं तिथं येतात आणि तिला मागे खेचतात.
मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून महिलेला ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Mother killed, Murder