नवी दिल्ली 29 ऑक्टोबर : दिल्लीतील एक तरुण अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणात दिल्लीतील करोलबाग पोलिसांच्या पथकाने खळबळजनक खुलासा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुगल मॅपच्या माध्यमातून तरुणाचा मृतदेह शोधून काढला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लव्ह ट्रायंगलमुळे तरुणाची त्याच्या मित्राने हत्या केली आहे. पोलिसांनी तपास केला असता, दिल्ली कँट परिसरातील लष्कराच्या मुख्यालयासमोरील हाय सिक्युरिटी एरियामध्ये सीवर लाइनच्या मेन होलमध्ये मृतदेह पडल्याचे आढळून आले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सीताराम सुथार (राजस्थान, वय-21 वर्षे) आणि इंदर चंद बुचा, वय-22 या दोघांना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील गांधी नगर येथील रहिवासी भगीरथ यांनी करोलबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांचा मुलगा मनीष (वय 22 वर्षे) हा गफ्फार मार्केट, करोलबाग येथील मोबाईल अॅक्सेसरीजच्या दुकानात काम करतो. जो अचानक बेपत्ता झाला आहे. ते पुढे म्हणाले की, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या मुलाची कार दिल्ली कॅंटमधील धौला कुआन येथे संशयास्पद अवस्थेत आढळून आली. कारच्या मागील सीटवर रक्ताचे डाग आढळून आले असून बेपत्ता मुलाचा मोबाईल बंद होता. जेव्हा हे प्रकरण संशयास्पद बनले तेव्हा बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्या अचानक बेपत्ता झाल्याची वस्तुस्थिती शोधण्यासाठी एसएचओ दीपक मलिक आणि एसआय विक्रम सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. हरवलेल्या मुलाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स मिळवले. यानंतर ज्यात तो काम करत होता त्या दुकानाजवळील कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तसेच त्याची कार जिथून जप्त करण्यात आली त्या भागातील कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. अचानक घरात आला अन् पत्नी मित्रासोबत दिसली; पतीने केला भयानक शेवट, पुण्यातील घटना कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि सीसीटीव्हीचे गहन स्कॅनिंग करण्यात आले. सीडीआरची तपासणी केल्यावर असं आढळून आले की, चुरू जिल्ह्यातील दोन व्यक्ती हरवलेल्या मुलाच्या म्हणजेच मनीष उर्फ विष्णूच्या सतत संपर्कात होत्या. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तयार केलेले पथक तात्काळ राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात रवाना झाले. दरम्यान, पीएस करोल बाग, दिल्ली येथे आयपीसी 365 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना कथित मोबाईल नंबरचे सध्याचे लोकेशन सापडले होते आणि 23 ऑक्टोबर रोजी सकाळी संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. सदर मोबाईल क्रमांक सीताराम सुथार या व्यक्तीच्या नावे होता. सीताराम सुथार आणि त्याचा मित्र इंदर चंद बुचा राजस्थानमधील होते. प्राथमिक चौकशीत दोघांनीही आपल्याला काहीही माहीत नसल्याची बतावणी केली. सतत चौकशी केल्यानंतर दोन्ही आरोपींनी बेपत्ता मुलाची हत्या करून मृतदेह टाकून दिल्याची कबुली दिली. चौकशीत आरोपी संजय बुचा याने उघड केलं की तो कोलकाता येथे शेअर ब्रोकरकडे संगणक सहाय्यक म्हणून काम करतो. तो मृत मनीष विष्णूला त्याच्या गर्लफ्रेंडमार्फत भेटला, जी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील होती. यापूर्वी मनीष उर्फ विष्णूचे आपल्या गर्लफ्रेंडसोबत जवळचे संबंध होते. यामुळे आरोपी संजय बुचा संतापला. त्याला वाटायचंकी मनीष उर्फ विष्णूने आपल्या गर्लफ्रेंडसोबत संपर्कात राहू नये. मात्र, तरीही मनीष तिच्या संपर्कात राहिल्याने संजयने त्याची हत्या करून त्याला रस्त्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमध्ये खुनाची मालिका सुरूच, एकाच रात्री दोन खून, शहरात खळबळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी त्याने मृत व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला दिल्लीत भेटण्यास सांगितले. संजय बुचा याने त्याचा शेजारी आणि मित्र सीताराम सुथार (व्यवसायाने सुतार) याच्याशीही संपर्क साधला. करोलबागमध्ये आल्यानंतर दोघांनी मनीष उर्फ विष्णू (मृत) याला पदम सिंग रोड, करोलबाग येथे बोलावून घेतले. दोन्ही आरोपींनी दारूची व्यवस्थाही केली होती. यानंतर मनीष उर्फ विष्णू हा त्याच्या कारमध्ये आला आणि आरोपीला भेटला. आरोपींनी त्याला दारू देऊ केली, यामुळे मयत दारूच्या नशेत होता. आरोपी संजयने त्याला गर्लफ्रेंडसोबतचा संपर्क तोडून तिचे फोटो डिलीट करण्यास सांगितलं. मात्र मनीष विष्णूने नकार दिल्याने ठरल्याप्रमाणे दोन्ही आरोपींनी गाडीच्या आत दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला. संजय बुचा याने मृताचा मोबाईल फोन तोडून जवळच असलेल्या घराच्या बाल्कनीत फेकून दिला. यानंतर दोघांनी मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेवला. त्यांनी मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्याचा प्रयत्न केला मात्र दिवाळीचे दिवे आणि सततची लोकांची वर्दळ यामुळे त्यांनी मृतदेह गाडीच्या मागील सीटवर सुमारे २ तास ठेवला. शेवटी ते दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात पोहोचले, जिथे लोकांची फारशी हालचाल नव्हती आणि त्यांनी मनीष उर्फ विष्णूचा मृतदेह लष्कराच्या ईएमई मुख्यालय, दिल्ली कॅंटसमोरील गटाराच्या मॅनहोलमध्ये फेकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी आरोपी संजय बुचा याने मयताच्या पर्समधून 20 हजार रुपये काढून पर्स मॅनहोलजवळ फेकून दिली. त्यानंतर तो मृताची कार डीटीसी बस स्टँड, डिफेन्स ऑफिसर्स एन्क्लेव्हसमोर सोडून दिल्लीतील धौला कुआन येथून रोडवेज बसने राजस्थानच्या चुरू येथे पळून गेला. आरोपींनी केलेल्या खुलाशाच्या आधारे या प्रकरणात आयपीसी कलम 302 जोडण्यात आले. आरोपीच्या सांगण्यावरून मृताचा खराब झालेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना दिल्लीचे रस्ते आणि मार्ग माहित नव्हते. त्यामुळे मृतदेह शोधून काढणे हे मोठे आव्हान होते. कारण आरोपींनी मृतदेह कोठे फेकून दिला हेच समजत नव्हतं. आरोपींनी मृतदेह टाकण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला हे शोधण्यासाठी टीमने आरोपींच्या गुगल मॅप टाइमलाइनची मदत घेतली. आरोपींनी मृतदेह ज्या ठिकाणी फेकून दिला त्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचण्यात यशस्वी झाले आणि आरोपींच्या सांगण्यावरून, लष्कराच्या ईएमई मुख्यालय, दिल्ली कँटसमोर असलेल्या गटाराच्या मॅनहोलमधून मृतदेह, पर्स आणि शूज जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असताना दोन्ही आरोपींना अटक करून एलडी कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.