जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अचानक घरात आला अन् पत्नी मित्रासोबत दिसली; पतीने केला भयानक शेवट, पुण्यातील घटना

अचानक घरात आला अन् पत्नी मित्रासोबत दिसली; पतीने केला भयानक शेवट, पुण्यातील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेत दहाव्या मजल्याहून पडल्यानंतर निलेश जार्वेकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती पंकज शिंदे याला अटक केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 पुणे 28 ऑक्टोबर : पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशय हा सगळ्या मोठा अडथळा असतो. दोघांमधील कोणालाही एकमेकांवर संशय यायला लागला की हे नातं शेवटाकडे जायला सुरुवात होते. अनेकदा या संशयाचा परिणाम अतिशय भयानक असतो. पिंपरी चिंचवडमधून अशीच घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरुन फेकून दिलं. संतापजनक! पत्नी गळफास घेत असताना पतीचं धक्कादायक कृत्य, वाचून बसणार नाही विश्वास भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत दहाव्या मजल्याहून पडल्यानंतर निलेश जार्वेकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती पंकज शिंदे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे, असं सांगून तो घरातून बाहेर पडला. याचदरम्यान पंकजच्या पत्नीचा मित्र निलेश जोर्वेकर तिला भेटायला आला. पंकजची पत्नी आणि निलेश हे जवळचे मित्र होते. मात्र, पंकज पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस आधीच गावावरून घरी परतला. यानंतर पत्नीला निलेशसोबत पाहून त्याचा पारा चढला. भावाची मस्करी जीवघेणी ठरली; फटाके फोडताना बहीण रक्तबंबाळ, रुग्णालयात नेताना मृत्यू यानंतर पंकजने पत्नीसमोरच निलेशसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान रागात पंकजने धारदार शस्त्राने निलेशला चाकूने भोकसलं. यात निलेश गंभीर जखमी झाला. यानंतर पंकजने निलेशला आपल्या घराच्या दहा मजल्याच्या गॅलरीतून खाली फेकलं. या घटनेत निलेशचा मृत्यू झाला. आरोपी पती पंकजला पोलिसांनी अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात