Home /News /crime /

तरुणीची आत्महत्या नाहीतर खून, एकाच रिपोर्टवरून पोलिसांनी 'त्या' विकृत तरुणाला पकडले

तरुणीची आत्महत्या नाहीतर खून, एकाच रिपोर्टवरून पोलिसांनी 'त्या' विकृत तरुणाला पकडले

पोलिसांच्या पथकाने डोंबिवली पश्चिम भागात जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, बागशाळा मैदान असा परिसर पिंजून काढला शेवटी कोपर ब्रिजजवळ एक व्यक्ती...

  भिवंडी, 16 ऑगस्ट : लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची एका 31 वर्षीय विकृत प्रियकराने तिचा ओढणीच्या साहाय्याने झाडावर लटकवून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून तिला निर्जनस्थळी नेऊन तिचा झाडाला गळफास देऊन तिचा खून केला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव या विकृत प्रियकराने रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात खुनी प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून डोंबिवली पश्चिम भागातून अटक करीत आरोपीला कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिपक जगन्नाथ रुपवते ( वय 31 रा. गोविंदवाडी, कल्याण पश्चिम ) असे अटकेत असलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे. तर किरण सावळे असं मृतक तरुणीचे नाव असून ती चंदनशिव नगर वाडेघर गाव,कल्याण पश्चिम येथे राहणारी होती. ....आणि धोनीने 62 लाखांची गाडी तब्बल 1.16 कोटींना घेतली विकत! मृतक तरुणी आणि आरोपी दीपक यांच्यात काही महिन्यापूर्वी ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. आरोपी दीपक हा व्यवसायाने रिक्षाचालक असून त्याने मृत किरणकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, किरण त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने प्रेयसी किरणचा काटा काढण्याचे ठरवले. त्याप्रमाणे 9 ऑगस्ट रोजी तिला कल्याणमधून बहाण्याने रिक्षात बसून भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डिंगचे मागे असलेल्या झाडाझुडपात नेले. त्याठिकाणी पुन्हा तिच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता दोघांमध्ये वाद होऊन त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आळवून खून केला. त्यांनतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती 3 दिवसांनी स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तिचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद 12 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. कोरोनाच्या कहरात मॉरिशसला मोठा झटका; समुद्रातील जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे दरम्यान, मृतक तरुणीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे उत्तरणीय अहवालात समोर आले. त्यांनतर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डिंगचे मागे एका तरुणीला तिच्या प्रियकराने जीवे मारले आहे आणि तो व्यक्ती डोंबिवली पश्चिम भागात फिरत आहे, अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी तात्काळ स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवा.दत्ताराम भोसले यांना बातमीची शहानिशा करून पुढील कारवाईसाठी कोनगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने डोंबिवली पश्चिम भागात जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, बागशाळा मैदान असा परिसर पिंजून काढला शेवटी कोपर ब्रिजजवळ एक व्यक्ती बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला त्याला पोलिसांचा संशय येताच पळू लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले आणि ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे दिपक जगन्नाथ रुपवते असे सांगितले. Ferari Ki Sawari पडली महागात! पोलिसांसमोर करायला गेला स्टंट, पोहचला थेट तुरुंगात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कसून चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी किरण ही लग्नाला नकार देत असल्या कारणामुळे तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, कुठलाही सुगावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण पोलिसांचे वरिष्ठाकडून कौतुक होत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime

पुढील बातम्या