....आणि धोनीने 62 लाखांची गाडी तब्बल 1.16 कोटींना घेतली विकत!

....आणि धोनीने 62 लाखांची गाडी तब्बल 1.16 कोटींना घेतली विकत!

धोनीला बाइक्स आणि गाड्यांचा प्रचंड छंद आहे. त्याच्याकडे आज एकापेक्षा एक गाड्यांचे कलेक्शन आहे.

  • Share this:

 

मुंबई, 16 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. आपला आवडता माही हा क्रिकेटमधून निवृत्त होणार या घोषणेनं तमाम चाहत्यांना अश्रू अनावर झाले. पण, धोनीने जसे मैदान गाजवले तसेच त्याचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा होते.

धोनीला बाइक आणि गाड्यांचा प्रचंड छंद आहे. त्याच्याकडे आता एकापेक्षा एक गाड्यांचे कलेक्शन आहे. महागड्या आणि सुपरकार्स धोनीकडे आहे. एवढंच नाहीतर धोनीकडे जुन्या बाइक्स सुद्धा आहे.

एकदा धोनीला एक कार प्रचंड आवडली. त्यामुळे त्याने ही कार खरेदी करण्याचे मनाशी पक्के केले. या कारची किंमत होती 62 लाख रुपये. पण धोनीने या कारसाठी तब्बल  1.16  कोटी रुपये मोजले होते.

ही गाडी होती Jeep Grand Cherokee Trackhawk.  धोनीला  Jeep Grand Cherokee Trackhawk ही प्रचंड आवडली होती. त्यामुळेच त्याने ही शानदार गाडी तब्बल 1.16 कोटींना खरेदी केली. या गाडीत 6.2-लिटर सुपरचार्ज्ड V8 HEMI इंजिन आहे.  या इंजिनमधून तब्बल 707 bhp पॉवर आणि 875 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे.

एवढंच नाहीतर या गाडीत 4-व्हील ड्राइव्ह सिस्टम दिली आहे. ही कार  3.62 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठते. या गाडीची  केबिन ही Nappa लेदरने तयार करण्यात आली आहे.

Jeep Grand Cherokee Trackhawk ची मुळ किंमतही  62 लाख रुपये आहे. पण त्यावेळी ही गाडी भारतात लाँच झाली नव्हती. त्यामुळे ही गाडी भारतात विक्री होत नव्हती. त्यामुळे धोनीने ही गाडी बाहेर देशातून मागवली. यासाठी त्याने जवळपास 1.16 कोटी रुपये मोजले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एखादी वस्तू भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो, त्यामुळेच या गाडीची किंमतही  62 लाखांवरून 1.16 कोटींवर पोहोचली.

धोनीकडे आणखी एक दमदार गाडी आहे Nissan Jonga.

धोनीकडे असलेली Nissan Jonga ही 1 Ton नावाने ओळखली जाते. पण ही निसान 4W70 सीरीजमधील गाडी आहे. या निसान जोंगामध्ये 6-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. या गाडीत मॅन्युअल गियरबॉक्स दिला आहे. ही गाडी लष्करात वापरली जात होती. पण, निसानने या गाडीचे उत्पादन बंद केले तेव्हा सर्वसामान्यांसाठी या गाडीची विक्री केली. तेव्हा धोनीनेही ही गाडी खरेदी केली.

Published by: sachin Salve
First published: August 16, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या