Home /News /videsh /

कोरोनाच्या कहरात मॉरिशसला मोठा झटका; समुद्रातील जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

कोरोनाच्या कहरात मॉरिशसला मोठा झटका; समुद्रातील जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

ही तेलगळती मॉरिशसच्या इतिहासातील सर्वात मोठं पर्यावरण संकट आहे. याचा मॉरिशसची अर्थव्यवस्था, फूड सिक्टोरिटी, आणि आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

    टोकियो, 16 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा कहर असताना समुद्रात झालेल्या 1000 टन तेलगळतीमुळे मॉरिशसचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथील समुद्रात अडकलेले जपानी जहाज अखेर दोन भागात तुटले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात तेलगळतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जपानी अधिकाऱ्यांनी शनिवार सांगितले की गेल्या महिन्यात जे मालवाहक जपानी जहाज 'एमवी वाकाशियो' (MV Wakashio) मॉरिशसमध्ये एका खडकाला धडक दिल्याने अडकले होते ते दोन भागांमध्ये तुटले असून त्याने दोन वेगळे (Japanese Ship Broken) भाग झाले आहेत. मॉरिशस नॅशनल क्राइसिस कमिटी (Mauritius National Crises Committe) ने सांगितले की शनिवारी जहाजची परिस्थिती खूप खराब झाली होती आणि दुपार होत असताना त्याचे दोन तुकडे झाले. कमिटीने हे देखील सांगितले की जहाजाच्या पुढील भाग सायंकाळी 4.30 वाजता वेगळा झाला होता. विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आता याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जहाजातून तेलगळतीमुळे समुद्री जीवांना धोका 25 जुलै रोजी हे जहाज एक कोरल रीफमध्ये अडकलं होतं. ज्यामधील 1,000 टन इंधन तेलाची समुद्रात गळती झाल्यामुळे समुद्री जीव यांचं जीवन धोक्यात आलं आहे. वैज्ञानिकांनी या घटनेला देशातील सर्वात धोकादायक परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. हिंद महासागरात एक मूंगा खडकाजवळ जपानच्या जहाजाची धडक झाल्याने इंधन गळती झाल्याने पर्यावरणीय संकट निर्माण झालं आहे. यामुळे मासे आणि समुद्री जीव धोक्यात आले आहेत. नागाशिकी शिपिंग कंपनीचं MV वाकाशिओ मॉरिशसच्या दक्षिणपूर्व तटावर 25 जुलै रोजी मूंगा खडकाला धडकले होते. यानंतर पंतप्रधान प्रविंद कुमार जगनाथ यांनी देशात पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे आणि आंतरराष्ट्रीय मदत मागितली. सॅटेलाइट छायाचित्रांमधून जहाजातील इंधन किनाऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. हा टँकर 299.5 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद आहे. यावर 20 जणांचा क्रू आहे. हे जहाज जिथं आहे त्याला संवेदनशील झोन म्हटले जाते. पर्यावरण तज्ज्ञ ग्रीनपीसने सांगितले की ही गळती मॉरिशसच्या इतिहासातील सर्वात मोठं पर्यावरण संकट आहे. याचा मॉरिशसची अर्थव्यवस्था, फूड सिक्टोरिटी, आणि आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या