मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तरुणीला फोन का करतो? असे म्हणत पोलिसाकडून सतत मारहाण, पुण्यातील किर्तनकाराचं भयानक पाऊल

तरुणीला फोन का करतो? असे म्हणत पोलिसाकडून सतत मारहाण, पुण्यातील किर्तनकाराचं भयानक पाऊल

संजय दशरथ मोरे हा असे आत्महत्या केलेल्या तरुण कीर्तनकाराचे नाव आहे.

संजय दशरथ मोरे हा असे आत्महत्या केलेल्या तरुण कीर्तनकाराचे नाव आहे.

संजय दशरथ मोरे हा असे आत्महत्या केलेल्या तरुण कीर्तनकाराचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातही आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आणखी एक धक्कादायक बातमी पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. एका पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुण किर्तनकाराने आत्महत्या केली. याप्रकरणी महादेव जाधव या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

संजय दशरथ मोरे हा असे आत्महत्या केलेल्या तरुण कीर्तनकाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी इंदापूरमध्ये उघडकीस आली. या यासंदर्भात मृत कीर्तनकाराच्या बहिणीने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महादेव जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. इंदापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

मृत संजय मोरे हा तरुण कीर्तनकार होता. त्याला पोलीस महादेव जाधव हा एका मुलीस फोन का करतो, असे म्हणत सतत मारहाण करायचा. इतकेच नव्हे तर घरी जाऊनही धमक्या द्यायचा. यासाठी तरुण किर्तनकाराने पोलीस कर्मचारी महादेव जाधवला स्पष्टीकरण देत त्याचा मोबाईल फोनही दाखवले होता. तसेच आपण कधीच कुणाला फोन केला नव्हता, असेही सांगितले. मात्र, तरीसुद्धा पोलिसाने त्याला बोलवून घेतले आणि अनेक ठिकाणी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या जाचाला कंटाळून अखेर या तरुण किर्तनकाराने आत्महत्या केली.

गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन -

दरम्यान, या घटनेनंतर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या या पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृत कीर्तनकाराच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केला होता. त्यांनी मृतदेहसुद्धा पोलीस ठाण्यात काही वेळ आणला होता. मात्र, पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी पोलीस यंत्रणेला कायद्यानुसार काम करु द्या, असे आवाहन केले.

हेही वाचा - गोड बोलून नातेवाईकाने जमीन विकायला लावली, फसवणूक झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

तसेच या प्रकरणाची अकस्मात मृत्यू दप्तरी नोंद करण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. तसेच या जबाबात कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतर आज अखेर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे.

First published:

Tags: Crime news, Police, Pune