मुंबई, 09 फेब्रुवारी : मुंबईजवळील (Mumbai) वसईमध्ये (vasai) एका ज्वेलर्सला (Jewelers) हनी ट्रॅपमध्ये (honey trap) अडकून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या दोन्ही महिलांनी मोठ्या शिताफीने ज्वेलर्सला आपल्या जाळ्यात अडकवले होते, पण ज्वेलर्सने या दोन्ही महिलांना कायमचा चांगलाच धडा शिकवला. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, वसईमध्ये 3 फेब्रुवारीच्या दरम्यान ही घटना घडली आहे. येथील स्थानिक ज्वेलर्स दुर्गासिंग राजपूत यांच्या दुकानात दागिणे गहाण ठेवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी प्राजक्ता पाटील ही आली होती. यावेळी प्राजक्ता पाटील हिने दुर्गासिंग राजपूत यांच्याशी बऱ्याच वेळ चर्चा केली. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी दुर्गासिंग राजपूत यांना आपल्या घरी बोलावले होते. यावेळी या महिलेने दुर्गासिंग याच्यासोबत अंगलट होण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार शेजारच्या खोलीत आरोपी ज्योती उपाध्यायसह आणखी एका पुरुषाने व्हिडीओ कॅमेऱ्यात सर्व प्रसंग कैद केला. त्यानंतर राजपूत याला हा व्हिडीओ दाखवून पैसे देण्यास धमकावण्यात आले. घाबरलेल्या अवस्थेत दुर्गासिंग याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पैसे दिले नाहीतर हा व्हिडीओ तुझ्या कुटु्ंबीयांना दाखवला जाईल, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी दिली. अखेर दुर्गासिंग याने ऑनलाईन साडेचार हजार रुपये दिले. तसंच आरोपींनी त्याच्याकडून दागिने सुद्धा हिसकावून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपी एका पुरुषाने आणि महिलेनं दुर्गासिंग राजपूत यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. अखेर त्यांच्या जाचाला कंटाळून राजपूत यांनी वसई पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. राजपूत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या घरावर छापा टाकून आरोपी महिला प्राजक्ता पाटील आणि ज्योती उपाध्याय या दोघींना अटक केली. परंतु, यादरम्यान त्यांचा पुरुष साथीदार आरोपी घटनास्थळावरून पळाला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 4 4, 4 364 (अ), 4 384 आणि 5 385 (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.