मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नर्सने गाठला क्रूरतेचा कळस; रूग्णांच्या नसांमध्ये दिलं हवेने भरलेलं इंजेक्शन, चौघांचा तडफडून मृत्यू

नर्सने गाठला क्रूरतेचा कळस; रूग्णांच्या नसांमध्ये दिलं हवेने भरलेलं इंजेक्शन, चौघांचा तडफडून मृत्यू

37 वर्षीय विल्यम डेव्हिसने टेक्सासमधील एका सुप्रसिद्ध रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया (Heart Surgery) केल्यानंतर बऱ्या झालेल्या रूग्णांचा छळ केला आणि त्यांची हत्या केली

  • Published by:  Kiran Pharate
वॉशिंग्टन 21 ऑक्टोबर : अमेरिकेच्या (America) एका सीरियल किलर (Serial killer) मेन नर्सला (Male Nurse) चार रुग्णांच्या हत्येप्रकरणी (Murder of Patients) दोषी ठरवण्यात आलं आहे. या मेल नर्सचं नाव विल्यम डेव्हिस (William Davis) असं आहे. डेव्हिसने रुग्णांना त्यांच्या धमन्यांमध्ये हवेनं भरलेलं इंजेक्शन देऊन ठार केलं. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, 37 वर्षीय विल्यम डेव्हिसने टेक्सासमधील एका सुप्रसिद्ध रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया (Heart Surgery) केल्यानंतर बऱ्या झालेल्या रूग्णांचा छळ केला आणि त्यांची हत्या केली. त्याने जून 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान या घटना घडवल्या होत्या. या प्रकरणात वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की डेव्हिसने जाणूनबुजून रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शनद्वारे हवा भरली होती. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वकिलांनी असाही दावा केला की डेव्हिसला 'लोकांना मारणे आवडायचं.' 24 तासात दोन नवजात मुलींची हत्या, 1 दिवसाच्या बाळाचं आईनंच दाबलं उशीनं तोंड डेव्हिसला जॉन लाफर्टी, रोनाल्ड क्लार्क, क्रिस्टोफर ग्रीनवे आणि जोसेफ कलिना यांच्या धमन्यांमध्ये हवा भरून इंजेक्शन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या सर्वांना 2017 ते 2018 दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. या चारही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरकारी वकिलांनी डेव्हिसला सिरियल किलर असं लेबल लावलं आहे. ते म्हणाले की त्याला लोकांना मारण्यात आनंद मिळतो. मुंबईच्या CRPF जवानाचा सासरवाडीच्या लोकांवर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू सुनावणी दरम्यान, डॉ विल्यम यारब्रोज यांनी न्यायालयाला सांगितलं, की मेंदूच्या धमनी प्रणालीमध्ये हवेचे इंजेक्शन देणं हे ब्रेन डॅमेज आणि मृत्यूचं कारण ठरू शकतं. एअर इंजेक्शनद्वारे मारण्याची कल्पना करणेदेखील कठीण आहे. सध्या, स्मिथ काउंटी जिल्हा न्यायालयाने डेव्हिसला चार लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवलं आहे. पुढील सुनावणीच्या वेळी शिक्षा सुनावली जाईल. डेव्हिसला जन्मठेपेची किंवा मृत्यूची शिक्षा होऊ शकते. वकिलांनी फाशीची मागणीही केली आहे.
First published:

Tags: Crime news, Murder news, Serial killer

पुढील बातम्या