Home /News /national /

मुलाच्या हव्यासापोटी 24 तासात दोन नवजात मुलींची हत्या; एक दिवसाच्या बाळाला संपवलं आईनंच, तर 16 दिवसांच्या मुलीचा मृतदेह बापानं पुरला शेतात

मुलाच्या हव्यासापोटी 24 तासात दोन नवजात मुलींची हत्या; एक दिवसाच्या बाळाला संपवलं आईनंच, तर 16 दिवसांच्या मुलीचा मृतदेह बापानं पुरला शेतात

पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात मुलाच्या हव्यासापोटी अशा दोन नवजात मुलींची (Girl Child Murder) हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

    पश्चिम बंगाल, 21 ऑक्टोबर: पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या 24 तासात मुलाच्या हव्यासापोटी अशा दोन नवजात मुलींची (Girl Child Murder) हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना बांकुरा जिल्ह्यातील (Bakura District)आहे, जिथे वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी आपल्या नवजात दुसऱ्या मुलीची हत्या केली. तर दुसरी घटना कोलकाता महानगरातील इक्बालपूर (Kolkata)येथील आहे, जिथे एका आईनंच नर्सिंग होममध्येच एका दिवसाच्या नवजात बाळाला उशीनं दाबून मारुन टाकलं. गेल्या 24 तासांत दोन नवजात बाळांची हत्या झाल्यानं पश्चिम बंगालचे सज्जन समजल्या जाणाऱ्या बंगाली समाजातील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ या घटनांवर टीका करत आहेत. एका दिवसाच्या नवजात मुलीची आईनंच केली हत्या मंगळवारी महानगरातील इक्बालपूर पोलीस ठाणे परिसरात एका आईनं उशीने तोंड दाबून तिच्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाची हत्या केली. मंगळवारी सकाळी 6.20 वाजता मुलीचा जन्म झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लवली सिंह (21) ला इक्बालपूर लेन येथील नेताजी सुभाष नर्सिंग होम आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. जिथे लवलीने मंगळवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. हेही वाचा- शिर्डी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत, अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना पाठवले अश्लील Video  शिफ्टमध्ये कार्यरत असलेल्या नर्सचे म्हणणं आहे की, मुलगी झाल्याचं समजताच लवली नाराज झाली. तिचा पती अजय सिंह तिच्यासोबत होता. बुधवारी सकाळी जेव्हा ती 5.30 -6.00 च्या दरम्यान ड्युटीवर असलेल्या आया मुलीला बघायला गेल्या तेव्हा मुलगी मृतावस्थेत आढळली. त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला कळवले आणि त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि सांगितले की तिच्या नाकावर दाबण्याच्या खुणा आहेत. लवलीच्या पतीनं सांगितलं की, तो सकाळी केबिनमधून चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता. मुलीच्या आईची बराच वेळ चौकशी करण्यात आली. ज्यानंतर तिनं कबूल केलं रात्री 12.30 नंतर आपण मुलीच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला मारुन टाकलं. वडिलांनी केली 16 दिवसाच्या मुलीची हत्या दुसरीकडे, धक्कादायक घटना बांकुराच्या छटना पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. वडिलांना मुलगा हवा होता, पण दुसरीही मुलगी झाली. त्यामुळे वडिलांनी आपल्या 16 दिवसांच्या मुलीची हत्या केली आणि तिला भातशेतात नेऊन पुरलं. बुधवारी कोजागरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका सोळा दिवसांच्या मुलीचा मृतदेह एका भातशेतात सापडला. हेही वाचा-एकाही मृत्यूची नोंद नाही, महापौरांच्या प्रतिक्रियेनं उंचावेल पुणेकरांची मान  पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीनाथ सोरेन सलग दोन मुलींच्या जन्मामुळे आनंदी नव्हता. दरम्यान, अचानक एक मुलगी गायब झाली. मुलगी सापडली नसल्यानं आईला संशय आला. आईनं पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावर छटना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर भातशेतात मुलीचा मृतदेह सापडला. तपासात तिच्या वडिलांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भात शेतात पुरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी वडील अश्विनीनाथ सोरेन याला अटक करण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: West bangal

    पुढील बातम्या