मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गणिताच्या शिक्षकाचा अश्लील कारनामा; विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण

गणिताच्या शिक्षकाचा अश्लील कारनामा; विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण

Teacher Shared Pornographic Video on Group: या शिक्षकाने शुक्रवारी शाळेच्या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केला. या ग्रुपमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही अॅड होत्या.

  • Published by:  Kiran Pharate

चेन्नई 20 डिसेंबर : पोलिसांनी चेन्नईतील एका खासगी शाळेतील गणिताच्या शिक्षकाला अटक केली आहे (Police Arrested Maths Teacher) . या शिक्षकाने इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर (Teacher Shared Pornographic Video On WhatsApp Group of Students) केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अंबत्तूरच्या आर मथिवानन नावाच्या गणिताच्या शिक्षकाने जवळपास दशकभरापूर्वी एका खासगी शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. सार्वजनिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

पत्नीवर मटण कापण्याच्या सुऱ्याने केले सपासप वार, नंतर मारली तलावात उडी!

या पार्श्‍वभूमीवर, कोविड महामारीदरम्यान ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या शिक्षकाने शुक्रवारी कथितरित्या या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केला. या ग्रुपमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही अॅड होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुपवर हा व्हिडिओ पाहताच विद्यार्थ्यांना धक्का बसला आणि लगेचच त्यांनी शाळेच्या मॅनेजमेंटकडे याबाबत तक्रार केली. शाळेनं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि मथिवानन यांनीही आपण हा व्हिडिओ शेअर केल्याचं मान्य केलं. मात्र आपण दारूच्या नशेत व्हिडिओ शेअऱ केल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर पोलिसांनी मथिवाननला पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत अटक केली. मथिवाननची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितले.

लहान मुलांना फोन देताय खेळायला? मोबाइलच्या स्फोटात दोन लहानगे होरपळले

दुसऱ्या एका घटनेत तिरुपूरमध्ये पालकांच्या आणखी एका गटाने शाळेच्या व्यवस्थापनाला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केलं आहे. या शिक्षकाने शाळेच्या कॅम्पसमध्ये 5 वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलीने पालकांना याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तत्काळ तिरुपूरमधील चिन्नापुदूर येथे इतर पालकांसह मिळून निषेध केला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Porn video