जयपूर, 19 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) अलवरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील एका घरात मोबाइलची (Mobile Blast) बॅटरी फुटल्यामुळे दोन लहान मुलं जळाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बॅटरी फुटल्याचा मोठा आवाज झाला. ब्लास्टचा आवाज ऐकून कुटुंबीय बाहेर आले. त्यांनी पाहिलं की दोन्ही मुलं रडत होती. एका मुलाचा चेहरा पूर्णपणे जळाला, तर दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्टला जखम झाली आहे. राजस्थानातून अलवरमधील कोटकासिममध्ये रविवारी वॉर्ड एकमध्ये राहणारे घनश्याम कश्यप याचा चार वर्षांचा मुलगा यश आणि दीड वर्षांचा भूपेंद्र घराच्या बाहेर खाटेवर खेळत होते. अचानक त्यांच्या हातातील मोबाइलच्या बॅटरीचा मोठा ब्लास्ट झाला. यात दोघेही जळाले. या दुर्घटनेत 4 वर्षांच्या यशचा चेहरा जळाला आहे. यशच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जळाल्याचे निशाण आहे. तर दुसरीकडे दीड वर्षांचा भूपेंद्र घराच्या बाहेर खाटेवर खेळत होता. अचानक त्याच्या हातातील मोबाइलची बॅटरी फुटली. यात दोन्हीही मुलं जळाली. हे ही वाचा- हृदयद्रावक! नवजात बाळाला फेकलं प्राण्यांमध्ये, कुत्र्यांनीच दाखवली खरी माणुसकी यानंतर तातडीने मुलांना रुग्णालयात नेण्यात आलं. मुलांच्या वडिलांनी सांगितलं की, मुलं सायंकाळच्या वेळेत खाटेवर खेळथ होते. त्यांच्या हातात मोबाइल होता. मध्ये मध्ये ते मोबाइल तोंडात घेत होते. यादरम्यान मोठा ब्लास्ट झाला. मोबाइलमधील बॅटरी फुटल्यामुळे हा ब्लास्ट झाला. यात दोन्ही मुलं जळाले. यानंतर त्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.