नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : पाळीव प्राण्यांची (Pet Animals) आवड असणाऱ्या व्यक्ती या प्राण्यांना भरपूर जीवही लावतात. या व्यक्ती पाळीव प्राण्यांची अगदी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. त्यामुळे, त्यांच्यासोबत काहीही वाईट किंवा चुकीचं घडलं की त्यांच्या मालकाला दुःख होतं. नुकतंच एका महिलेलाही धक्का बसला, जेव्हा तिला समजलं की तिच्या पाळीव घोडीवर एका व्यक्तीनं बलात्कार केला (Rape on Pet Horse) आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून अनेकांना हे ऐकून धक्का बसला आहे.
बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्समधील वरिष्ठ डॉक्टरचं कृत्य
अमेरिकेच्या फ्लोरिडा (Florida) येथून 57 वर्षाच्या सँटिआगो विक्टोरियाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की त्यानं एका घोडीसोबत अश्लील कृत्य (Vulgar Act with Pet Horse) केलं आहे. 18 सप्टेंबरला मालकीण कॅथरीन एंजलनं पाहिलं की तिच्या पाळीव घोड्याच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे. कॅथरीननं आधी कधीच आपल्या घोड्याच्या गळ्यात दोरी बांधलेली नव्हती. त्यामुळे इथे कोणीतरी आलं होतं, याची तिला चाहूल लागली. त्यामुळे तिनं लगेचच सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) तपासला. यातील दृश्य पाहून तिला धक्का बसला.
कॅथरीननं पाहिलं एक रात्री उशिरा एक व्यक्ती घोड्याच्या तबेल्यात घुसला. या व्यक्तीनं पाळीव घोडी मारियासोबत घाणेरडं कृत्य केलं. काही वेळानंतर सँटिआगो तिथून निघून गेला, मात्र काहीच वेळात तो तिथे परतला आणि हेच कृत्य त्यानं पुन्हा केला. इतकं करूनही तो थांबला नाही. त्याच रात्री तिसऱ्यांदा तो तिथे आला आणि तिसऱ्यांदा घोडीसोबत घाणेरडं कृत्य केलं.
गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीकडून ‘तालिबानी’ शिक्षा, तोंडाला काळं फासून काढली धिंड
कॅथरीननं जेव्हा ही पूर्ण घटना पाहिली तेव्हा तिला धक्का बसला. तिनं तब्बल १० दिवसांनंतर पोलिसांकडे तक्रार केली. ५ ऑक्टोबरला कॅथरीननं पोलिसांना सांगितलं की आरोपी एका वेल्डिंग कंपनीत काम करतो. तो तबेल्याच्या जवळच गाडी उभा करतो. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं आपला गुन्हा मान्य केला. मात्र, आपण किती वेळा घोडीसोबत हे घृणास्पद कृत्य केलं, हे त्याला आठवत नव्हतं. सध्या तो तुरुंगात असून त्याला 56 लाख रुपयांच्या बॉन्डवर अटक केली गेली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Rape news