मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीकडून ‘तालिबानी’ शिक्षा, तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार, पाहा VIDEO

गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीकडून ‘तालिबानी’ शिक्षा, तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार, पाहा VIDEO

एका गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीनं तालिबानी (Talibani punishment to a youth) शिक्षा देत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षा कशाबद्दल केली हे वाचलं तर कुणाच्याही डोक्यात सणक जाईल.

एका गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीनं तालिबानी (Talibani punishment to a youth) शिक्षा देत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षा कशाबद्दल केली हे वाचलं तर कुणाच्याही डोक्यात सणक जाईल.

एका गतिमंद तरुणाला ग्रामपंचायतीनं तालिबानी (Talibani punishment to a youth) शिक्षा देत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षा कशाबद्दल केली हे वाचलं तर कुणाच्याही डोक्यात सणक जाईल.

चंदिगढ, 15 ऑक्टोबर : एका तरुणाला ग्रामपंचायतीनं तालिबानी (Talibani punishment to a youth) शिक्षा देत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शौचाला बसण्याच्या मुद्द्यावरून झालेलं (Issue arise over toilet) भांडण वाढत गेलं आणि त्यानंतर गावातील सर्वांनी या तरुणाची तालिबानी पद्धतीनं धिंड काढल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. हा तरुण गतीमंद असून त्याची अवस्था समजून न घेता गावकऱ्यांनी त्याच्यावर केलेल्या अन्यायाची चर्चा सध्या पंचक्रोशीत रंगली आहे.

शौचाला बसण्यावरून वाद

हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात घुसकानी गावात हा प्रकार घडला. शेजारील गावातील एक गतीमंद तरुण या गावात आला होता. सकाळच्या वेळेला तो रस्त्यावरच शौचाला बसल्याचं गावातील काही महिलांना दिसलं. महिलांनी त्यावर आक्षेप घेत तरुणाला जाब विचारला. हा तरुण गतीमंद असल्याचं महिलांना माहित नव्हतं. त्यामुळे महिलांसोबत त्याची वादावादी झाली. हा प्रकार पाहून गावातील काही तरुण सरसावले आणि त्यांनी तरुणाला धक्काबुक्की करत पोलिसांत केस दाखल केली. " isDesktop="true" id="618545" >

पोलीस ठाण्यात झाला समेट

पोलीस ठाण्यात हा तरुण गतीमंद असल्याचं सांगितल्यानंतर गावातील आक्षेप घेणाऱ्या महिला शांत झाल्या आणि त्यांनी केस मागे घेत समेट करण्याची तयारी दाखवली. तरुणाच्या नातेवाईकांनीदेखील केस मागे घेण्याची तयारी दाखवत प्रकरण मिटवण्याचं ठरवलं. मात्र त्यानंतर या तरुणाची धिंड काढल्यानंतरच प्रकरण मिटेल, अशी भूमिका गावातील पंच मंडळींपैकी काहींनी घेतली आणि सरपंचांनी ती उचलून धरली. पोलीस ठाण्यात अशी काही चर्चा झाल्याचं अनेकांना माहित नसल्याचं आता समोर आलं आहे. मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर गावातील मंडळी तरुणाला घेऊन गेली आणि त्याची धिंड काढण्याची तयारी करण्यात आली.

हे वाचा - dasara melava : मंत्रिपद भाड्याने दिलंय, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

अशी काढली धिंड

तरुणाच्या चेहऱ्याला काळं फासून आणि त्याला चपलांचे हार घालून त्याची धिंड काढण्यात आली. भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा असन पोलिसांनी धिंड काढणाऱ्यांविरोथात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Haryana