नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 09 ऑक्टोबर : संशयाचा भूत मानगुटीवर बसलं तर माणूस काय करेल याचा नेम नाही. भंडारा जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात वरवंटा घालून पत्नीला ठार मारल्याची घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी इथं समोर आली आहे. .या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना अरविंद रामटेके (40) असं मृत पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अरविंद माधव रामटेके (43) याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चनासोबत 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमीच वाद होत होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. (आधी मटण खाऊ घातलं, दारू पाजली; राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली) शनिवारच्या दिवशी पती पत्नीचे भांडण विकोपाला गेले. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास अरविंदने रागाच्या भरात घराचा दरवाजा बंद केला आणि पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला. ( प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने घेतला बदला; आधी स्वतःच्या अपहरणाचा बनाव मग मुंबईतील तरुणाचं धक्कादायक कृत्य ) हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुलगा भाविक रामटेके यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पती अरविंद रामटेके याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.