मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आणखी एका ज्वेलर्सची हत्या, भर दिवसात दुकानात घुसून केले सपासप वार, VIDEO

आणखी एका ज्वेलर्सची हत्या, भर दिवसात दुकानात घुसून केले सपासप वार, VIDEO

 किशोर जैन (kishor jain) हे दुकानात प्रवेश करत असताना आरोपींनी गिऱ्हाईक असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला.

किशोर जैन (kishor jain) हे दुकानात प्रवेश करत असताना आरोपींनी गिऱ्हाईक असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला.

किशोर जैन (kishor jain) हे दुकानात प्रवेश करत असताना आरोपींनी गिऱ्हाईक असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला.

नालासोपारा, 21 ऑगस्ट : ठाण्यातील (thane) बेपत्ता असलेल्या ज्वेलर्स भरत जैन (bharat jain murder case) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच  खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असताना नालासोपारा (nalasopara) पश्चिमेकडील स्टेशन परिसरात दिवसा ढवळ्या दोन अज्ञात आरोपींनी एका सोनाराच्या दुकानात शिरून लुटमार करत त्याची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ज्वेलर्स (sakshi Jewelers) असं या दुकानाचे नाव आहे. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुकानाचे मालक किशोर जैन (kishor jain) हे दुकानात प्रवेश करत असताना आरोपींनी गिऱ्हाईक असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकान मालकाची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांची विविध पथके सध्या घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. मात्र, दिवसाढवळ्या हत्या व दरोड्याचा या प्रकारामुळे नालासोपारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता भरत जैन यांचा मृतदेह आढळला दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेले भरत जैन  यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नीने ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन (Naupada Police Station) मध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंब्रा खाडीत मृतदेह आढळू आला आहे. पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही ठाण्यातील मुंब्रा खाडी परिसरात असलेल्या गणेश विसर्जन घाट परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह म्हणजे ज्वेलर्स भरत जैन यांचाच असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली आहे याबाबत गूढ कायम आहे. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या