पिंपरीतील बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाची अपहरणानंतर हत्या; महाडमध्ये आढळला मृतदेह

पिंपरीतील बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाची अपहरणानंतर हत्या; महाडमध्ये आढळला मृतदेह

पिंपरीतून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाचा मृतदेह रायगडमधील महाड येथे सापडला आहे. 4 फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता झाले होते.

  • Share this:

पिंपरी, 8 फेब्रुवारी : पिंपरीतून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाचा मृतदेह रायगडमधील महाड येथे सापडला आहे. 4 फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता झाले होते. या व्यावसायिकाच्या भावाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पिंपरी पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असतानाच, त्यांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

पिंपरीतील या व्यावसायिकाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. आनंद साहेबराव उनवणे असं मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांचा चिटफंडचा व्यवसाय होता. 45 वर्षीय आनंद उनवणे गुरुवारपासून बेपत्ता झाल्याने तशी तक्रार दाखल करण्यात आली.

(वाचा - नागपूरकरांचा ऑन द स्पॉट फैसला, दगडाने ठेचून गुंडाला संपवलं)

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आनंद यांचा मृतदेह शनिवारी रायगडमधील महाड येथे पाण्यात आढळला.

(वाचा - पाण्याच्या एका घोटासाठी सुरजकुमार पेटलेल्या अवस्थेत डोंगरावरून धावत खाली आले,पण.)

आनंद यांचं अपहरण, हत्या कोणी केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. महाडमध्ये मृतदेह आढळल्यानंतर त्याबाबत पिंपरी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि बेपत्ता झालेल्या आनंद यांचाच मृतदेह असल्याची ओळख पटली आहे. पोलिसांकडून त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास सुरू आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 8, 2021, 9:38 AM IST

ताज्या बातम्या