जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाण्याच्या एका घोटासाठी सुरजकुमार पेटलेल्या अवस्थेत डोंगरावरून धावत खाली आले होते, पण...

पाण्याच्या एका घोटासाठी सुरजकुमार पेटलेल्या अवस्थेत डोंगरावरून धावत खाली आले होते, पण...

पाण्याच्या एका घोटासाठी सुरजकुमार पेटलेल्या अवस्थेत डोंगरावरून धावत खाली आले होते, पण...

आरोपींनी या नेव्ही ऑफिसरचं चेन्नईमध्ये अपहरण करून त्याला पालघरच्या जंगलात जिवंत जाळण्यात आलं. गंभीररित्या जळलेल्या या अधिकाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 फेब्रुवारी : पालघरमध्ये (Palghar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका नेव्ही ऑफिसरचं (Navy Officer) अपहरण करून त्याला जिवंत जाळल्याची भयानक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी या नेव्ही ऑफिसरचं चेन्नईमध्ये अपहरण करून त्याला पालघरच्या जंगलात जिवंत जाळण्यात आलं. गंभीररित्या जळलेल्या या अधिकाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यू झालेला नेव्ही अधिकारी 27 वर्षीय सूरज कुमार झारखंडच्या पलामू येथील राहणारा होता. आरोपींनी सूरज कुमारला बंदुकीच्या धाकावर चेन्नई विमानतळावरुन जवळच उभ्या केलेल्या एका कारमधून त्याचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला तीन दिवस चेन्नईच्या एका अज्ञान ठिकाणी कोंडून ठेवण्यात आलं. आरोपींनी नेव्हीच्या या अधिकाऱ्याला सोडण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी सूरजला पालघरच्या डहाणू तलासरी भागात जंगलात आणून जिवंत जाळलं. पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याने सूरज यात संपूर्ण खोरपळून गेला.

(वाचा -  धक्कादायक! घरात घुसून केली दोन महिलांची हत्या; तीन मुलं गंभीररित्या जखमी )

जळलेल्या अवस्थेत असलेल्या सूरजकडे एका स्थानिकाचं लक्ष गेलं, त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात सूरजला दाखल करण्यात आलं. रुग्णालयातच सूरजने पोलिसांना अपहरणाबाबत सांगितलं. दरम्यान 90 टक्के जळालेल्या सूरजची तब्येत आणखी खालावत गेल्याने डॉक्टरांनी त्यांला मुंबईला हलवण्यास सांगितलं. परंतु मुंबईत उपचारादरम्यान शनिवारी सूरजचा दुर्दैवी मृत्यू झाला. सूरज कुमार 2001 मध्ये सिबिंग सीमॅन म्हणून भारतीय नौदलात सामिल झाला होता. तो झारखंडच्या पलामू येथील राहणारा होता. पालघर पोलिसांनी तिघांविरोधात कलम 307, 364, 392 आणि 34 के अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात