वॅकूवर, 05 जानेवारी : जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भीतीचं वातावरण आहे. नवा स्ट्रेन 70 टक्के वेगानं पसरत असल्यानं धोका अधिक आहे. अशा परिस्थित वारंवार सांगूनही अनेक नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याचं सातत्यानं दिसत आहे. प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या अशाच एका प्रवाशाला टॅक्सी चालकानं चांगलीच अद्दल घडवली आहे. प्रवाशाला मास्क लावण्यासाठी वारंवार सांगूनही त्यानं ऐकलं नाही. प्रवासी टॅक्सीत बसला आणि त्यानं टॅक्सी आपल्या कामाच्या ठिकाणी नेण्याच्या सूचना केल्या. चालकानं त्याला मास्क लावण्यासाठी सांगितल्यावर प्रवाशानं नकार दिला. याबाबत टॅक्सी चालकानं तातडीनं याची माहिती प्रशासन यंत्रणा 911 वर आणि पोलिसांना दिली. इतकच नाही तर चालकानं ही तक्रार केल्यावर या प्रवाशानं त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या सर्व नियमांचं उल्लंघन केल्यानं अखेर टॅक्सी चालकाचा संयम सुटला आणि त्यानं टॅक्सी थेट पोलीस ठाण्याच्या दिशेनं फिरवली. हे वाचा- स्वदेशी लशीचा बालकांवरही यशस्वी प्रयोग, लहान मुलांसाठीही Covaxin सुरक्षित मिळालेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकानं थेट पोलीस ठाण्यात टॅक्सी नेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकच नाही तर 690 डॉलर्स म्हणजे जवळपास 50 हजार रुपयांचा दंड देखील भरण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न लावणं, चालकासोबत गैरव्यवहार करणं आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी प्रवाशाविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना कॅनडामधील वँकूवर परिसरात घडली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी न्यू इयरच्या रात्री नशेत होता. त्यामुळे त्याने टॅक्सी चालकासोबत गैरवर्तन केल्याचंही समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.