जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सुनेसाठी सासऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, नातवासह चढला पाण्याच्या टाकीवर आणि...

सुनेसाठी सासऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, नातवासह चढला पाण्याच्या टाकीवर आणि...

सुनेसाठी सासऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, नातवासह चढला पाण्याच्या टाकीवर आणि...

एक व्यक्ती त्याच्या दोन वर्षाच्या नातावाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढल्याने एकच खळबळ उडाली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 31 डिसेंबर : बऱ्याचदा नात्यातील समस्यांमुळे कौटुंबिक वाद उद्भवतात. काहीवेळा अशा वादातून गुन्हे घडतात. मात्र राजस्थानमध्ये कौटुंबिक वादातून घडलेली घटना काहीशी वेगळी होती. दोन वर्षाच्या नातवासह एक वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढली. माझी सून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत आहे. ती घरी परतली नाही तर मी नातवासह टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन, असं त्याने प्रशासनाला सांगितलं. या वृद्ध व्यक्तीने दिलेली ही धमकी ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली. अखेरीस पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या वृद्ध व्यक्तीची समजूत काढण्यात यश आलं. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही व्यक्ती पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरली. राजस्थानमधील बरन येथील छाबरा गावातील एक व्यक्ती त्याच्या दोन वर्षाच्या नातावाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिथेच उभे राहून त्याने त्याची सून अन्य व्यक्तीसोबत राहत आहे, ती घरी परतली नाही तर मी नातवासह टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन, असं प्रशासनाला सांगितलं. हेही वाचा :  नागपुरात धक्कादायक घटना, प्रेमसंबंधातून विवाहितेला पळविले, अन् पतीसोबत…. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कौटुंबिक वादाचं आहे. राधेशाम खाती यांचा मुलगा विनोदचा काही वर्षांपूर्वी राखी नावाच्या युवतीशी विवाह झाला. विनोद आणि राखीला दोन वर्षाचा मुलगा आहे. पण एकेदिवशी अचानक राखी माहेरी पळून गेली. त्यानंतर ती दुसऱ्या एका युवकासोबत विनोदच्या घरासमोर दुसरं घर घेऊन राहू लागली. यामुळे विनोद आणि त्याचे कुटुंबीय तणावात आहेत. सुनेला अनेकदा समजवून सांगण्याचा प्रयत्न करूनही ती सासरी परतली नाही. ती अजूनही दुसऱ्या युवकासोबत राहत आहे. सून घरी परत यावी यासाठी राधेशाम यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा :  नवरा म्हणाला, त्याच्यासोबत संबंध ठेवू नकोस…, बायकोने प्रियकरासोबत मिळून केला त्याचाच गेम! राधेशाम खाती नातावासह पाण्याच्या टाकीवर चढल्याचे समजताच पोलीस आणि प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी राधेशाम खातींना समजवण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न केला. ``जर माझी सून घरी परतली नाही तर मी पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन. माझ्या मृत्यूला सून जबाबदार असेल,`` अशी राधेशाम यांची भूमिका कायम होती. सुरुवातीला त्यांनी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विनंती मान्य केली नाही. त्यानंतर तुमच्या सुनेला समजावून सासरी पाठवलं जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर राधेशाम खाती टाकीवरून खाली उतरले. या कौटुंबिक वादाची आणि फिल्मी स्टाईल प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात